चाेरटयाने केला ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 04:29 PM2020-11-20T16:29:57+5:302020-11-20T16:30:04+5:30
प्रभाकर गणपत वानखडे हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असता अज्ञात चाेरटयाने कुलूप, कळीकाेंडा ताेडून घरातील ९३५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील महात्मा फुले चाैकातील एका घराचा कळीकाेंडा ताेडून अज्ञात चाेरटयाने ९३५०० रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाेलीसांनी अज्ञात आराेपिविरुध्द गुन्हा दाखल केला.
महात्मा फुले चाैक वाशिम येथील रहिवासाी प्रभाकर गणपत वानखडे हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असता अज्ञात चाेरटयाने कुलूप, कळीकाेंडा ताेडून घरातील ९३५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. वानखडे यांनी पाेलीसात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चाेरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच वाशिम येथील काटीवेश भागातील एका सुवर्णकाराच्या दुकानातून ग्राहक बनून येऊन ६० हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. वाशिम येथील काटीवेश येथील सुवर्णकार कातीर्ककुमार वर्मा यांच्या दुकानात एक ग्राहक येऊन त्याने साेन्याच्या दागिन्यांची पाहणी केली. अनेक वस्तु पाहता पाहता त्याने ६० हजाराचा माल लंपास केल्याची बाब लक्षात आल्यानंतर वर्मा यांनी पाेलिसात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवुरन अज्ञात चाेरटयाविरुध्द गुन्हा दाखल् करण्यात आला.
(प्रतिनिधी)