जिल्ह्यात ९,५८३ कोरोना योद्ध्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:39 AM2021-05-15T04:39:27+5:302021-05-15T04:39:27+5:30
जिल्ह्यात ७ हजार ७२५ आरोग्य सेवक, १२ हजार ४६७ फ्रंटलाईन वर्कर्स, १ लाख ४० हजार ३४ ज्येष्ठ नागरिक आणि ...
जिल्ह्यात ७ हजार ७२५ आरोग्य सेवक, १२ हजार ४६७ फ्रंटलाईन वर्कर्स, १ लाख ४० हजार ३४ ज्येष्ठ नागरिक आणि १८ ते ४४ वर्षे वयोगटातील १० हजार नागरिक अशा एकूण १ लाख ७० हजार २२६ जणांची लसीकरणासाठी १३ मे पर्यंत अधिकृत नोंदणी झालेली आहे. त्यापैकी १ लाख ५९ हजार ९९१ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून ३२ हजार ३२४ जणांना दुसरा डोस मिळालेला आहे; तर १ लाख २७ हजार ६६७ जण अद्याप दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. त्यात ९ हजार ८२ कोरोना योद्ध्यांचाही समावेश आहे.
..................................
किती लसीकरण?
पहिला डोस दुसरा डोस
आरोग्यसेवक - ६७७५/३८०५
फ्रंटलाईन वर्कर्स - ११८६०/५२७७
ज्येष्ठ नागरिक - १३४०३६/२३२४२
१४-४४ वयोगट - ७३२०/००
................
बॉक्स -
एकही डोस न घेणारे १५५७
जिल्ह्यात ७ हजार ७२५ आरोग्य सेवकांची लसीकरणासाठी नोंद झाली होती; मात्र त्यातील ६ हजार ७७५ आरोग्य सेवकांनीच लसीचा पहिला डोस घेतला. ९५० जणांनी याबाबत उदासीनता दर्शविली. तसेच १२ हजार ४६७ फ्रंटलाईन वर्कर्सची नोंद झाली असताना ११ हजार ८६० जणांनी लस घेतली; तर ६०७ जणांनी याकडे पाठ फिरवली. यानुसार, एकही डोस न घेणारे १५५७ कोरोना योद्ध्यांचा एकही डोस न घेणाऱ्यांमध्ये समावेश आहे.