९७ कि.मी. रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:29+5:302021-02-23T05:01:29+5:30
................ पाणी बचतीसाठी ग्रा.पं.चा पुढाकार जऊळका रेल्वे : गावात दरवर्षी मार्च महिन्यानंतर पाणीटंचाई जाणवते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने ...
................
पाणी बचतीसाठी ग्रा.पं.चा पुढाकार
जऊळका रेल्वे : गावात दरवर्षी मार्च महिन्यानंतर पाणीटंचाई जाणवते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने नियोजन आखले आहे. त्यानुसार पाणी बचतीचे आवाहन केले जात आहे. यासंबंधी प्रभावी जनजागृती सुरू असल्याचे दिसत आहे.
................
विद्युत देयक थकविणाºयांवर कारवाई
मेडशी : परिसरातील घरगुती वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात विद्युत देयके थकीत आहेत. वारंवार आवाहन करूनही देयके अदा होत नसल्याने अखेर महावितरणने धडक कारवाईची मोहीम हाती घेऊन वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरू केली आहे.
.............
्प्लाास्टिक सेवनाने गुरांचे आरोग्य धोक्यात
किन्हीराजा : प्लास्टिक पिशव्यांच्या विक्री व वापरावर निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असताना हा नियम पाळला जात नसून किन्हीराजा येथे ठिकठिकाणी साचत असलेला प्लास्टिक कचरा सेवनाने मोकाट गुरांचे आरोग्य धोक्यात सापडत असल्याचे दिसून येत आहे.
..............
डॉक्टर असोेसिएशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मालेगाव : कम्युनिटी हेल्थ अकॅफिसर (सीएचओ) पदाच्या जागा अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर व कम्युनिटी मेडीकल सर्व्हीस अॅन्ड इसेंसिशल ड्रग पात्रताधारक व्यक्तींमधून भरण्यात याव्या, अशी मागणी अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर असोेसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे १८ फेब्रूवारी रोजी पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
...............
पात्र लाभार्थींना कर्ज मिळेना
वाशिम : सुशिक्षित, अर्धशिक्षित युवक व युवतींसाठी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री रोजगार योजना अंमलात आणली. छोट्या उद्योजकांना उद्योगासाठी प्रोत्साहन देणे, हा यामागील उद्देश आहे; मात्र जिल्ह्यात अर्ज करूनही पात्र लाभार्थींना कर्ज मिळत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी शुक्रवारी निवेदनाव्दारे केली.
..................
घरकुलाचा निधी मिळण्याची मागणी
वाशिम : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधून दीड वर्षे उलटली; मात्र शेवटच्या हप्त्याचा निधी अद्यापपर्यंत मिळालेला नाही. याच विषयावर मध्यंतरी साखळी उपोषणदेखिल करण्यात आले; मात्र काहीच फायदा झाला नसल्याची तक्रार मो. नसीरोद्दीन यांनी जिल्हाधिकाºयांकडे शुक्रवारी केली.
......................
धान्य पुरवठा करण्याची मागणी
जऊळका रेल्वे : नवीन शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी येथील गावकºयांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे शुक्रवारी पाठविलेल्या निवेदनात केली आहे. नव्याने शिधापत्रिका मिळालेल्या अनेकांना अद्याप धान्य पुरवठा झालेला नाही, असे निवेदनात नमूद आहे.
.......................
लोकवर्गणीसाठी लोकांचा पुढाकार
रिसोड : तालुक्यातील निजामपूर येथे स्मशानभुमीचे लोकसहभागातून सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यानुषंगाने लोकवर्गणी करण्यासाठी गाव परिसरातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती स्मशानभुमी सुशोभीकरण समितीचे सदस्य तथा सरपंच डिगांबर जाधव यांनी दिली.