बाजार समिती निवडणुकीत ९९ टक्के मतदान
By admin | Published: September 7, 2015 01:37 AM2015-09-07T01:37:46+5:302015-09-07T01:37:46+5:30
वाशिम बाजार समिती मतदान शांततेत, सोमवारी मतमोजणी.
वाशिम : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात आले. मतदानाची टक्केवारी ९८.५५ असून, २४८४ पैकी २४४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. वाशिम बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी एकूण ३९ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले होते. २ हजार ४४८ मतदार असलेल्या या निवडणूकीत सेवा सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारण -७, महिला -२, इतर मागासप्रवर्ग -१, व्हीजेएनटी-१ अशा एकूण ११, ग्राम पंचायत मतदार संघात सर्वसाधारण -२, अनुसुचित जाती जमाती- १, आर्थिक दुर्बल घटक -१ अशा एकूण -४, व्यापारी मतदार संघ-२ व हमाल मापारी मतदार संघ-१ अशा एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक झाली. आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून १५ उमेदवार, ओबीसीमधून तीन, सर्वसाधारण महिला चार, विजा, भजमधून दोन उमेदवार, ग्रामपंचायत सर्वसाधारणमधून चार उमेदवार, ग्रामपंचायत एस.सी. एस.टी. प्रवर्गातून दोन उमेदवार, ग्रामपंचायत दुर्बल घटकातून दोन उमेदवार, अडते, व्यापारी प्रवर्गातून चार उमेदवार आणि हमाल मापारी प्रवर्गातून तीन उमेदवार असे एकूण ३९ उमेदवार निवडणुकीत उभे होते. व्यापारी -अडते मतदारसंघात २१२ पैकी २00 मतदारांनी मतदान केले असून, टक्केवारी ९४ आहे. हमाल-मापारी मतदारसंघातून ३८५ पैकी ३८२ मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी ९९.२२ आहे. सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११८८ पैकी ११८२ मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी ९९.४९ आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातून ६९९ पैकी ६८४ मतदारांनी मतदान केले असून, टक्केवारी ९७.८५ आहे. वाशिम बाजार समितीच्या निवडणुकीत एका बाजूने आजी-माजी आमदार तर दुसर्या बाजूने माजी सभापती नारायणराव गोटे व प्रभाकर लांडकर यांच्या पॅनलमध्ये टस्सल झाली. या कोण बाजी मारणार, हे सोमवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.