चाकू मारून जखमी केल्याने चार जणांवर गुन्हा दाखल, मंगरूळपीर तालुक्यातील चिखलागड येथील घटना

By नंदकिशोर नारे | Published: May 6, 2023 12:55 PM2023-05-06T12:55:25+5:302023-05-06T12:55:51+5:30

Washim: चाकूने मारून जख्मी केल्याने आसेगाव पोलीसांनी  ५ मेच्या रात्री उशिरा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे

A case has been registered against four people for stabbing and wounding, the incident at Chikhalagad in Mangrulpir taluka | चाकू मारून जखमी केल्याने चार जणांवर गुन्हा दाखल, मंगरूळपीर तालुक्यातील चिखलागड येथील घटना

चाकू मारून जखमी केल्याने चार जणांवर गुन्हा दाखल, मंगरूळपीर तालुक्यातील चिखलागड येथील घटना

googlenewsNext

- नंदकिशाेर नारे

वाशिम : चाबिचे गुछ्यातील चाकूने मारून जख्मी केल्याने आसेगाव पोलीसांनी  ५ मेच्या रात्री उशिरा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चिखलागड येथील सुरेश राठोड (वय ३५) यांनी आसेगाव पाेलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार  आरोपी विवेक जाधव (वय २४), गोकुळ जाधव (वय २६), राजेंद्र जाधव (वय ५०) व गणेश जाधव (वय ४०) सर्व रा . चिखलागड यांनी  २० एप्रिल रोजी शेतातील ईलेक्ट्रिक विद्युत तारेच्या अवैधरित्या ताराचे आकोडे टाकुन विज चोरुन घेतली असे  म्हटले असता त्यांनी वाद घालुन शिवीगाळ केली. तसेच  दोन्ही हात धरुन गैरअर्जदारांनी खिशातील चाबीचे गुच्छातील धारदार चाकुने उजवे दंडावर मारुन जखमी केले .यावेळी माझी आई व पत्नी सोडविण्यासाठी आली असता त्याना सुद्धा मुठगोठ्याने  मारुन जखमी केले.  पोलीसांनी आराेपिंवर कलम ३२४,३२५,५०४,३४ नुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल केला .

Web Title: A case has been registered against four people for stabbing and wounding, the incident at Chikhalagad in Mangrulpir taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.