बसवर दगडफेक केल्याप्रकरणी गुुन्हा दाखल; ऑफिसमधील घड्याळही फोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 03:26 PM2022-10-20T15:26:38+5:302022-10-20T15:27:11+5:30

एक इसम हातात दगड घेऊन काही एक कारण नसताना माझ्या ताब्यातील बस क्र. एमएच १३ सीयु ६७१९वर समोरील दर्शनी काचेवर दगड मारला. 

A crime has been registered for stone pelting on a bus, the clock in the office was also broken | बसवर दगडफेक केल्याप्रकरणी गुुन्हा दाखल; ऑफिसमधील घड्याळही फोडले

बसवर दगडफेक केल्याप्रकरणी गुुन्हा दाखल; ऑफिसमधील घड्याळही फोडले

Next

मंगरुळपीर : एस. टी. बसवर दगड मारून काच फोडून आगारातील साहित्याचे नुकसान केल्याने पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगरुळपीर एसटी डेपोचे वाहनचालक सुजित शेषराव जाधव यांनी तक्रार दिली की, १९ ऑक्टोबर रोजी बस क्र. एमएच १३ सीयु ६७१९ वर दिग्रस डेपोमधून संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास निघालो असता संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मंगरुळपीर बस डेपोमध्ये पोहचलो. बस अकोलाकडे जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर लावली व एन्ट्री करण्यासाठी कन्ट्रोल रुममध्ये जाऊन परत आलो. त्यावेळी एक इसम हातात दगड घेऊन काही एक कारण नसताना माझ्या ताब्यातील बस क्र. एमएच १३ सीयु ६७१९वर समोरील दर्शनी काचेवर दगड मारला. 

दगड मारल्यामुळे बसची काच तडकली. त्याला तू दगड का मारला, अशी विचारणा करण्यासाठी आमच्या डेपोचे कंट्रोल रुममध्ये नेले. तेथे त्याने पुन्हा आमच्या कंट्रोलरूममधील टेलिफोन, घड्याळ, माईक फोडून नुकसान केले. तोडफोड करत असताना त्यालासुध्दा दुखापत झाल्याचे दिसले. सदर व्यक्ती दारुच्या नशेत होती, असे दिसत होते. त्यानंतर तो तेथून पळून गेला. मी सदर व्यक्तीबाबत चौकशी केली असता त्याचे नाव तुषार राजू पाईकराव (रा. मंगलधाम, मंगरुळपीर) असल्याचे समजले. या घटनेत बसचे व कंट्रोल रूममधील साहित्याचे मिळून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले, अशा तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३२६, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A crime has been registered for stone pelting on a bus, the clock in the office was also broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.