वाशिम जिल्ह्यातील मुस्लीम युवकाने मक्केत फडकवला तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 11:41 PM2022-08-16T23:41:38+5:302022-08-16T23:44:15+5:30
भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवार १५ ऑगस्टला संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा जल्लोष केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही भारतीयांनी स्वातंत्र्याचा जल्लोष करून भारत माता की जय, हिंदूस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. सोबतच राष्ट्रगीतही गायले.
वाशिम (कारंजा): जिल्ह्यातील कारंजा येथील सोयल रहेमान चाऊस हा मक्का मदिना यात्रे दरम्यान सौदीमध्ये १३ ऑगस्ट रोजी गेला असता दरम्यान १५ ऑगस्ट रोजी अमृत महोत्सवा निमित्त भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन अमृतमहोत्सव साजरा केला. हा ध्वज तो कारंजा येथून घेऊन गेला होता. त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.