खंडनी न दिल्याने कुख्यात गुंडानं केली युवकाची हत्या, अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील घटना

By सुनील काकडे | Published: April 22, 2023 07:16 PM2023-04-22T19:16:18+5:302023-04-22T19:16:41+5:30

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अवघ्या तीन तासांत अटक केली आहे.

A notorious goon killed a youth for not paying ransom, an incident at Varood in Amravati district | खंडनी न दिल्याने कुख्यात गुंडानं केली युवकाची हत्या, अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील घटना

खंडनी न दिल्याने कुख्यात गुंडानं केली युवकाची हत्या, अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील घटना

googlenewsNext


वाशिम - जिल्ह्यातील धनज बु. (ता.कारंजा) येथील एका युवकास कुख्यात गुंडाने खंडनी मागितली. ती न दिल्याने त्याने त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अवघ्या तीन तासांत अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील धनज येथील केवल माणिकराव सोनटक्के (२७) हा युवक वरूड येथे ऑनलाईन लाॅटरीचे दुकान चालवित होता. त्याच्याकडे फंट्या उर्फ दिपक अशोक कावनपुरे या कुख्यात गुंडाने पैशाची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी फंट्याने केवल सोनटक्के याच्या मानेवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पोबारा केला.

यावेळी नागरिकांनी धावपळ करून केवलला वरूडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. फिर्यादी अकुंश जोगदंड (परभणी) याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी फंट्या उर्फ दिपक अशोक कावनपूरे याच्यावर भादंविचे कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून स्थानिक मुलताई चाैकातून अवघ्या तीन तासात त्याला जेरबंद केले.

फंट्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल
आरोपी फंट्या हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर यापूर्वी तडिपारी आणि एमपीडीएची कारवाई सुध्दा झाली आहे. मागील एक महिण्यांपूर्वी तो तडिपारी भोगून आला होता. त्याच्यावर अवैध दारूविक्री व मारहाणीचेही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: A notorious goon killed a youth for not paying ransom, an incident at Varood in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.