उभ्या ट्रकवर खासगी बस धडकली; ४ प्रवासी ठार १२ जण गंभीर

By नंदकिशोर नारे | Published: May 9, 2023 02:31 PM2023-05-09T14:31:56+5:302023-05-09T14:32:10+5:30

मालेगाव-मेहकर मार्गावरील घटना

A private bus hit a standing truck; Four passengers were killed and twelve were seriously injured | उभ्या ट्रकवर खासगी बस धडकली; ४ प्रवासी ठार १२ जण गंभीर

उभ्या ट्रकवर खासगी बस धडकली; ४ प्रवासी ठार १२ जण गंभीर

googlenewsNext

नंदकिशोर नारे

वाशिम: रस्त्यावर उभ्या ट्रकला खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या ट्रकने मागून धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात ४ जण ठार, तर १२ जण गंभीर जखमी झाले. ही घटना मालेगाव-मेहकर रोडवर वडपनजिक सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची पीवाय-०५ ई १९५८ क्रमांकाची एक प्रवासी बस सोमवार ८ मे रोजी रात्री मालेगावमार्गे पुणेकडे जात होती. मार्गातील वडपनजिक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या आरजे ४७, जीए १८५० क्रमांकाच्य ट्रकवर ही बस धडकली. या भीषण अपघातात बसमधील चार प्रवासी ठार झाले, तर १२ जण गंभीर जखमी झाले. मंगेश शेषराव तिके (२५ वर्षे) रा. वाघजाळी जि. वाशिम, अक्षय प्रभु चव्हाण (२३ वर्षे) रा. साखरा जि. यवतमाळ, दिपक सुरेश शेवाळे (२७ वर्षे) रा. गणेशपुर केनवड जि वाशिम आणि अजय भारत शेलकर (२३ वर्षे) रा. कडसा जि. यवतमाळ, अशी मृतकांची, तर सुशिला राठोड (२५ वर्षे), रवि राठोड (३२ वर्षे), संदेश चव्हाण (२० वर्षे), स्वाती राठोड (०७ वर्षे) सर्व रा. वडगाव जि. यवतमाळ, देविदास आडे (४० वर्षे) रा. पन्हाळा जि. यवतमाळ, रविंद्र गुंजकर (३९ वर्षे), भिमराव वाकुडे (६५ वर्षे) दोघेही रा. केनवड जि. वाशिम, अमोल मनोहर (२९ वर्षे), संजय राठोड (४० वर्षे), विठ्ठल राठोड (४५ वर्षे) सर्व रा. यवतमाळ, रामचरण राऊत (६४ वर्षे) रा. महागाव जि. यवतमाळ आणि विठ्ठल केनवडकर (३६ वर्षे), अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती १०८ क्रमांकावर मिळताच अवघ्या काही मिनिटांत १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि रुग्णवाहिक चालक राहुल सांगळे आणि डॉ. हेमंत जोरेवार यांनी सर्व जखमींना तातडीने मालेगाव रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

अपघातानंतर बसचालक फरार

वडपनजिक घडलेल्या अपघातानंतर खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या अपघातग्रस्त बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. या अपघात प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला. तर ट्रकचीही मोडतोड झाली.

Web Title: A private bus hit a standing truck; Four passengers were killed and twelve were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.