कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू
By सुनील काकडे | Published: September 17, 2023 11:01 PM2023-09-17T23:01:39+5:302023-09-17T23:02:48+5:30
वाशिम : जिल्ह्यातील आमखेडा (ता.मालेगाव) येथील कृषी महाविद्यालयात ‘बीएससी.ॲग्री’चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा गुंज येथे शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ...
वाशिम : जिल्ह्यातील आमखेडा (ता.मालेगाव) येथील कृषी महाविद्यालयात ‘बीएससी.ॲग्री’चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा गुंज येथे शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, वाशिम येथील रहिवासी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत जनार्दन काकडे यांचा मुलगा रामकृष्ण काकडे हा आमखेड्याच्या कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शिक्षणाचाच एक भाग म्हणून पीक पाहणी कार्यानुभव प्रात्यक्षिकासाठी तो अन्य विद्यार्थ्यांसोबत १७ सप्टेंबर रोजी गुंज येथे गेला होता.
यावेळी तोल जावून पाण्याने तुडूंब भरलेल्या मोठ्या शेततळ्यात तो पडला. पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे त्याच्यासोबतच्या अन्य विद्यार्थ्यांनाही पोहता येत नसल्याने त्याचे प्राण वाचू शकले नाही, अशी माहिती प्राप्त झाली.