रस्त्यावर धावत्या बसचा टायर फुटला, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली
By दिनेश पठाडे | Published: August 28, 2022 06:41 PM2022-08-28T18:41:13+5:302022-08-28T18:43:48+5:30
चांदूर रेल्वे ते औरंगाबाद बस क्रमांक एमएच ४० एक्यू ६४६१ हे बस नेहमी प्रमाणे औरंगाबाद जाण्यासाठी निघाली
वाशिम : चांदूर रेल्वे येथून औरंगाबादला निघालेल्या बसचा जागमाथा परिसरात टायर फुटल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवून बसवर नियंत्रण मिळवले. चालकाने दाखवेल्या प्रसंगावधानामुळे अपघात टळल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या. सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने बसमधील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.
चांदूर रेल्वे ते औरंगाबाद बस क्रमांक एमएच ४० एक्यू ६४६१ हे बस नेहमी प्रमाणे औरंगाबाद जाण्यासाठी निघाली. चालक मरापे व वाहक म्हणून नवरंगे हे कर्तव्यावर होते. दगड उमरा परिसरातील जागमाथा येथे २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक एसटीबसचे समोरचे चाक फुटल्याचे चालक मरापे यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीवर नियंत्रण मिळवले. आणि एसटी बाजूला थांबवून प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. धावत्या बसचा अचानक टायर फुटल्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडतात मात्र चालक मरापे यांनी वेळीच दक्षता बाळगत धावत्या एसटीवर नियंत्रण मिळविल्याने अपघात टळला.