८१ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:13 AM2020-06-24T11:13:45+5:302020-06-24T11:14:00+5:30
चार दिवसांत ६ हजार ७५० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जारी लॉकडाऊनमुळे बंद पडलेली आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया १८ जूनपासून प्रशासनाने पुन्हा सुरू केल्यानंतर गेल्या चार दिवसांत ६ हजार ७५० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाची संख्या आता ८१ हजार ५१ झाली आहे.
राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेककरीता जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले असून आतापर्यंत ७० हजार ९६५ शेतकºयांना ४५३ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. तथापि, लॉकडाऊनच्या कालावधीत उर्वरित २८ हजार २५८ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण रखडल्यामुळे या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणे कठीण झाले होते. आता १८ जूनपासून प्रशासनाने आधार पुन्हा आधार प्रमाणिकरण सुरू केल्यानंतर गेल्या चार दिवसांत ६ हजार ७५० शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाची संख्या आता ८१ हजार ५१ झाली असून, उर्वरित अद्यापही २१ हजार ५०८ शेतकºयांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.
४ दिवसांत ६ हजारावर आधार प्रमाणीकरण
लॉकडाऊनमुळे प्रलंबित असलेली आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया १८ जूनपासून पुुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर जिल्हाभरातील ६ हजार ७५० शेतकºयांचे शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
प्रमाणीकरणाची प्रक्रिया
आधार प्रमाणिकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, खाते क्रमांक, थकीत कर्ज रक्कम संगणक स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तरच ‘मान्य’ पर्याय निवडावा