४५ हजार शेतकऱ्यांनी केली आधार क्रमांकात दुरुस्ती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 03:38 PM2019-12-18T15:38:43+5:302019-12-18T15:38:49+5:30
आधार क्रमांकात दुरूस्ती करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली असून, आता २० डिसेंबरपर्यंत शेतकºयांनी दुरूस्ती करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गंत आधार क्रमांकात त्रूटी असलेल्या ९५ हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास ४५ हजार शेतकºयांनी १७ डिसेंबरपर्यंत ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर अँड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून दुरूस्ती केली आहे. आधार क्रमांकात दुरूस्ती करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली असून, आता २० डिसेंबरपर्यंत शेतकºयांनी दुरूस्ती करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार १०० शेतकरी कुटूंबाचा डाटा लाभार्थी म्हणून पाठविण्यात आला आहे. यापैकी ९७ हजार ७२७ लाभार्थ्यांच्या आधार संबंधित माहितीमध्ये अंशत: त्रूटी आढळून आलेल्या आहेत. या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) यांच्याकडे आधार कार्ड व बँॅकेच्या पासबुकची छायांकित प्रत देणे अपेक्षित आहे. आधार कार्ड संबधित त्रुटीच्या दुरुस्ती नजिकच्या सीएससी केंद्रातून केल्या जाऊ शकतात. याशिवाय स्वत: लाभार्थ्याना कोणत्याही अॅन्ड्राइड मोबाईल संचावरुनही आधार संबंधित दुरुस्ती करता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी ‘पीएम किसान डॉट गव्ह. डॉट ईन’ या संकेतस्थळावर जावून होम स्क्रीनवरील हिरव्या पट्टीमधील डावीकडून क्रंमाक आठवर ‘फार्मर्स कॉर्नर’ची सुविधा देण्यात आली आहे. या आॅप्शनचा वापर करून शेतकºयांना आपल्या आधारकार्डमधील दुरुस्ती करता येते. दुरूस्ती करण्याला तिसºयांदा मुदतवाढ दिली असून, आता २० डिसेंबरपर्यंत दुरूस्ती करता येणार आहे. जिल्ह्यात १७ डिसेंबरपर्यंत ९५ हजार शेतकºयांपैकी ४५ हजार शेतकºयांनी दुरूस्ती केली असून, अद्याप ४९ हजार ७०० शेतकºयांनी दुरूस्ती केली नाही. आधार क्रमांकातील त्रूटीची पुर्तता करून अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
(प्रतिनिधी)