पदोन्नतीतील आरक्षणासाठी आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 05:11 PM2021-06-26T17:11:28+5:302021-06-26T17:12:01+5:30
वाशिम : मागासवर्गीय कर्मचाºयांचे पदोन्नतीमध्ये आरक्षण शासनाने रद्द केल्यामुळे झालेल्या अन्यायाविरुध्द दाद मागण्यासाठी आरक्षण हक्क कृती समितीसह विविध ...
वाशिम : मागासवर्गीय कर्मचाºयांचे पदोन्नतीमध्ये आरक्षण शासनाने रद्द केल्यामुळे झालेल्या अन्यायाविरुध्द दाद मागण्यासाठी आरक्षण हक्क कृती समितीसह विविध संघटनांच्यावतीने २६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मागास प्रवर्गातील ३३ टक्के कर्मचाºयांना पदोन्नतीत आरक्षण दिले जात होते. परंतू, राज्य शासनाने ७ मे २०२१ रोजी शासन निर्णय पारीत करीत पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण संपुष्टात आणले आहे. मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांच्या राखीव कोट्यातील सर्व रिक्त जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे शासनाचे निर्देश असून, या निर्णयानुसार कार्यवाही करण्याचा सपाटा सुरू आहे. याविरोधात लढा देण्यासाठी व ७ मे रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याकरिता मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी संघटना यांनी एकत्र येवून राज्यस्तरीय आरक्षण हक्क कृती समिती गठीत केली. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून २६ जून रोजी आरक्षण हक्क कृती समिती व विविध सामाजिक संघटना, कर्मचारी संघटनांतर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात झाली. आरक्षणविरोधी शासनाचा धिक्कार असो, मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, यासह विविध घोषणा देण्यात आल्या. पोलीस स्टेशन चौक, बसस्थानक, सिव्हिल लाईनमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धडकला. यावेळी शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत राज्य शासनाकडे सादर केले. या मोर्चात राज्य आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य प्रतिनिधी मिलींद उके, जिल्हा निमंत्रक विश्वनाथ महाजन, रिपाइं जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे, हेमंत तायडे, विशाल डुकरे, राजेश भारती यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.