वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविल्या जाणार ‘आॅन दी स्पॉट’!

By admin | Published: May 12, 2017 08:48 AM2017-05-12T08:48:47+5:302017-05-12T08:53:27+5:30

ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १७ व १८ मे रोजी जिल्हा दौ-यावर येत आहेत.

'Aan the Spot' to be resolved by electricity consumers' grievances! | वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविल्या जाणार ‘आॅन दी स्पॉट’!

वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविल्या जाणार ‘आॅन दी स्पॉट’!

Next

वाशिम : ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १७ व १८ मे रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते वीज ग्राहकांशी थेट संवाद साधणार असून, तक्रारी निकाली काढणार आहेत. यानुषंगाने ग्राहकांनी वीजसंदर्भात त्यांना जाणवणाऱ्या समस्यांसंबंधीची तक्रार १५ मेपर्यंत महावितरणकडे सादर करावी, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी विकास आडे यांनी केले आहे.
१८ मे रोजी वाशिम येथील महावितरणच्या मंडळ कार्यालय प्रांगणात सकाळी ११ ते १ या कालावधीत ह्यजनतेशी संवादह्ण या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ऊर्जामंत्री ना. बावनकुळे हे नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या तक्रारी, सूचना व निवेदनांचे निराकरण करणार आहेत. यावेळी महावितरण, महापारेषण या कंपनीचे कनिष्ठ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक ते वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. तथापि, महावितरणशी संबंधित तक्रारी, सूचना, किंवा निवेदनाची प्रत १५ मे २०१७ पर्यंत महावितरण मंडळ, विभाग अथवा तालुकास्तरावरील उपविभागीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार असून, या उपक्रमाचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 'Aan the Spot' to be resolved by electricity consumers' grievances!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.