वैद्यकीय अधिकाऱ्यांविरूद्ध आशा, गटप्रवर्तक एकवटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 06:32 PM2021-02-09T18:32:30+5:302021-02-09T18:32:56+5:30
Washim News आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेत धडक देत मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले.
वाशिम : कामाचा मोबदला नियमित मिळावा, वैद्यकीय अधिकाºयांकडून अपमानास्पद वागणूक नसावी तसेच आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा पदभार काढण्यात यावा आदी मागण्यांसाठी वारला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया गावातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेत धडक देत मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले.
वारला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविका म्हणून कार्यरत असताना, आरोग्यविषयक सर्व कर्तव्य पार पाडले जात आहे. कुष्ठरूग्ण, क्षयरुग्ण शोध मोहिम असो की माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिम असो या सर्व मोहिमेत आशा, गटप्रवर्तकांनी कर्तव्य बजावले आहे. कामाचा मोबदला नियमित मिळत नाही, तीन महिन्यांपासून मोबदला बँक खात्यात जमा करण्यात आला नाही, वैद्यकीय अधिकाºयांकडून अपमानास्पद वागणूक मिळते, अशी तक्रार आशा व गटप्रवर्तकांनी ८ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. एका वर्षापूर्वी वैद्यकीय अधिकाºयांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने तक्रार केली असता, प्रभार काढण्यात आला होता. परंतू, काही दिवसातच संबंधित वैद्यकीय अधिकाºयांकडे प्रभार देण्यात आला. याप्रकरणी न्याय मिळावा, प्रलंबित मोबदला तातडीने देण्यात यावा आणि वैद्यकीय अधिकाºयांकडून आशा व गटप्रवर्तकांचा पदभार काढण्यात यावा, अशी मागणी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी केली.