अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे दुसरे जिल्हा मराठी संमेलन रविवारी वाशिममध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 03:44 PM2017-12-14T15:44:42+5:302017-12-14T15:44:42+5:30

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय आणि विदर्भ साहित्य संघ शाखा, वाशिम यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे दुसरे जिल्हा मराठी संमेलन येत्या १७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

AB Marathi Sahitya Mahamandal's Second District Marathi Conference will be held in Washim on Sunday | अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे दुसरे जिल्हा मराठी संमेलन रविवारी वाशिममध्ये

अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे दुसरे जिल्हा मराठी संमेलन रविवारी वाशिममध्ये

Next
ठळक मुद्देफुले महाविद्यालय, वि.सा.संघाचा पुढाकार: विविध उपक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय आणि विदर्भ साहित्य संघ शाखा, वाशिम यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे दुसरे जिल्हा मराठी संमेलन येत्या १७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता प्रा. डॉ. अनिल सोनुने, प्रा. सुरेंद्र वानखेडे आणि सहकारी स्वराभिवादन हा कार्यक्रम सादर करतील. यावेळी डॉ. सरोज बाहेती यांच्याहस्ते ग्रामीण वस्तू प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे. काव्याग्रहाचे व्यवस्थापकीय संपादक तथा समर्थ अकादमीचे संचालक विठ्ठल जोशी यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा. डॉ. सुनील अभिमान अवचार हे संमेलनाध्यक्ष, तर प्रा. हरिभाऊ क्षीरसागर हे स्वागताध्यक्ष आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी मुख्य अतिथी आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, डॉ. विलास चिंतामण देशपांडे, नामदेव कांबळे, बाबाराव मुसळे, नरेंद्र लांजेवार, हर्षवर्धन पवार, प्र. म. राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. महामंडळाचे कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके हे संमेलनामागील भूमिका मांडतील. त्यानंतर सकाळी साडेअकरा ते एक या वेळेत ‘लोकजीवनाची विविध रूपे’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. यात डॉ. नीलेश हेडा ‘नदीकाठची दुर्लक्षित समाजरूपे’, प्रल्हाद पौळकर ‘आदिवासी आणि लोककला’, मोहन शिरसाट ‘ऐतिहासिक वारसा’, प्रा. अनंत देव ‘सण उत्सव, परंपरा’, सतीश जामोदकर ‘कृषी जीवन’ हे या विषयांसह सहभागी होतील. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान डॉ. श्रीकांत राजे भूषवणार आहेत.
याचदिवशी दुपारी दोन ते तीन या वेळेत ‘इरसाल नमुन्यांची गावरान झलक’, हा मिश्कील अनुभव कथांवर आधारित कार्यक्रम होईल. त्याचे अध्यक्षस्थान भारत लादे भूषवणार असून यात राजेश ठवकर, गोपाल खाडे, चाफेश्वर गांगवे, नीलेश सोमाणी, प्रवीण राऊत सहभागी होणार आहेत. त्यानंतर मुलाखतकार डॉ. विजय काळे हे नेत्रदूत चेतन उचितकर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत ‘असे बोलते माझे विश्व’, हा महिलांचा टॉक शो होणार आहे. यात डॉ. लता जावळे, प्रा. यास्मिन शेख, डॉ. अर्चना मेहकरकर, सिंधू तुपकर, अ‍ॅड. गीतांजली गवळी, डॉ. प्रियांका विभूते सहभागी होणार आहेत. दुपारी साडेचार ते पाच या वेळेत संमेलनाचा समारोप होईल, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: AB Marathi Sahitya Mahamandal's Second District Marathi Conference will be held in Washim on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम