आत्मप्राप्तीसाठी मोहाचा त्याग करा -  मुनीश्री सुप्रभसागरजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 02:44 PM2018-09-16T14:44:17+5:302018-09-16T14:44:32+5:30

वाशिम : प्रत्येकांमध्येच काही सद्गुण, अवगुण असतात.  छळ, कपट यापासून दूर राहा, कल्याणकारी भावना जोपासा, आत्मप्राप्तीसाठी मोहाचा त्याग करा, असे प्रतिपादन मुनीश्री सुप्रभसागरजी यांनी रविवारी केले.

Abandon the temptation for self-realization - Munishri Suprabhasagarji | आत्मप्राप्तीसाठी मोहाचा त्याग करा -  मुनीश्री सुप्रभसागरजी 

आत्मप्राप्तीसाठी मोहाचा त्याग करा -  मुनीश्री सुप्रभसागरजी 

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रत्येकांमध्येच काही सद्गुण, अवगुण असतात.  छळ, कपट यापासून दूर राहा, कल्याणकारी भावना जोपासा, आत्मप्राप्तीसाठी मोहाचा त्याग करा, असे प्रतिपादन मुनीश्री सुप्रभसागरजी यांनी रविवारी केले. स्थानिक महावीर भवन येथे चातुर्मास समिती, सकल जैन समाजाच्यावतीने १४ सप्टेंबरपासून समयसारोपासक साधना संस्कार शिबिरास प्रारंभ झाला असून, १६ सप्टेंबरला ‘उत्तम आर्जव’ या विषयावर ते बोलत होते.
मंचावर मुनीश्री आराध्यसागरजी, मुनीश्री प्रणतसागरजी महाराज उपस्थित होते. यावेळी मुनीश्री सुप्रभसागरजी म्हणाले की, आज बहुतेक जण मोह, माया याच्या मागे लागलेला आहे. जोपर्यंत आपण यामध्ये गुंतून राहू, तोपर्यंत आपल्या ‘आर्जव’ प्राप्त होणार नाही. धर्माचे दहा लक्षणे असून त्यामध्ये उत्तम क्षमा, उत्तम विचार, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम सत्य, उत्तम संयम, उत्तम तप, उत्तम त्याग, उत्तम आकुंचन, उत्तम ब्रह्मचर्य यांचा समावेश आहे. जो जसा बोलतो, तसा चालतो तोच खरा आर्जव आहे. त्याचीच जगात पूजा होत असते, असेही मुनीश्री सुप्रभसागरजी म्हणाले. प्रत्येकजण दुसºयाच्या अवगुणावर लक्ष ठेवून असतो. काम, क्रोध, मोह, माया याविषयी तो दुसºयाबाबत बोलतो; मात्र स्वत:चे आत्मपरिक्षण करीत नाही. मात्र लक्षात ठेवा की प्रदर्शन आणि दर्शनात नेहमी अंतर असते. तुटलेली लेखणी आणि दुसºयांप्रती द्वेष कधीच आपले भाग्य लिहू देणार नाही. आपले भाग्य आपल्याच हातात आहे. त्यामुळे कल्याणकारी व चांगल्या भावना जोपासा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी दूरवरून आलेल्या भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.

Web Title: Abandon the temptation for self-realization - Munishri Suprabhasagarji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.