राज्य सरकारवरील कर्ज फेडण्याची क्षमता वाढत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:14 AM2017-11-04T02:14:28+5:302017-11-04T02:15:11+5:30
वाशिम : राज्य सरकारवरील कर्ज वाढले आहे, पण ते फेडण्याची क्षमता वाढत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केले. ते ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव शहरातील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य सरकारवरील कर्ज वाढले आहे, पण ते फेडण्याची क्षमता वाढत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केले. ते ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव शहरातील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच जिल्हातील मालेगाव, वाशिम, रिसोड, मानोरा, कारंजा व मंगरुळपीर येथेही त्यांची पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी जि .प. सदस्य शाम बढे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा कृउबासचे संचालक गोपाल पाटील राऊत, कृउबासचे माजी उपसभापती प्रा आंनद देवळें, जिल्हा सरचिटणीस संदीप पिंपळकर यांच्यासह पदाधिाकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पाठक म्हणाले की, राज्य शासनावर कर्जार्चा बोझा वाढला आहे. विकासकामांसाठी कर्ज काढावे लागते ते कर्ज फेडण्यासाठीची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. नोटांबंदीमुळे रियलक्ष्स्टेट मध्ये मंदी आलेली आहे, ही चांगली गोष्ट आहे.
हे सरकारचे यश आहे. त्याचे चांगले परिणाम होणार आहेत. राज्यात फडणवीस शासनाने ३४ हजार कोटींची कर्जमाफी केली. शेतकर्यांसाठीच्या खर्चावर अर्थसंकल्पात वाढ केली. ३५ लाख टी. एम. सी. एवढी जलासाठ्यात वाढ झाली. १.५ लाख कृषी पंप जोडणी केल्या. राज्यात २१00 हवामान केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. विजेमध्ये राज्य स्वंयपूर्ण आहे.
कृषीपंपाना सौर ऊर्जा पुरविण्यात येणार असूनख् राज्यात विदेशी गुंतवणूक वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले. वाशिम येथे भाजपाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत न. प. उपाध्यक्ष रुपेश वाघमारे व सरचिटणीस संदिप पिंपरकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मानोरा येथे आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा उपाध्यक्ष ठाकरे तर मंगरुळपीर येथे भाजपा नेते सुरेश लुंगे यांच्यसह पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाची विदर्भ विकासासाठी समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या मागार्मुळे कृषी मालाला अतिशय कमी वेळात देशभर व परदेशात पोहचविता येणार आहे. समृद्धी महामागार्मुळे स्मार्ट सिटी ही संकल्पनाही पूर्णत्वास जाणार आहे. रात्रंदिवस नागरिकांच्या संरक्षणात असणार्या पोलिसांसाठीही अनेक योजना राबविल्या जात असून, त्यांच्या राहण्यासाठी घरे बांधण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. राज्यात कौशल्यविकासा अंतर्गत ८ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्या गेले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी अडकलेली इंदू मिलची जागा मिळवून त्यामधील सर्व अडथळे या सरकारने दूर केले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामही मार्गी लागले आहे, असेही शेवटी विश्वास पाठक म्हणाले.