लग्नाचे वऱ्हाड घेउन जाणाऱ्या वाहनाचा अपघातात ३२ जण जखमी
By नंदकिशोर नारे | Published: April 20, 2024 05:03 PM2024-04-20T17:03:13+5:302024-04-20T17:04:58+5:30
या अपघातात ३२ जण जखमी झाले असून यापैकी १६ जणांना वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले आहे.
नंदकिशोर नारे, वाशिम : दिग्रस तालुक्यातील कोलुरा येथील लग्नाचे वऱ्हाड एका वाहनात मानोरा तालुक्यातील अजणी येथे घेऊन जात असताना वापटा घाटात वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पलटी झाले. त्यात ३२ जण जखमी झाले असून यापैकी १६ जणांना वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले आहे. त्यात चार जण गंभीर असल्याची माहिती आहे.
कोलुरा येथील हिरामण डहाने यांच्या मुलाचे लग्न अजणी येथे आज होते. सकाळी वऱ्हाड घेऊन टाटा ४०७ हे वाहन निघाले होते. मानोरा येथून कारंजा रस्त्यावरील अजनी येथे जात असताना वापटा घाटात वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठड्याला धडकले आणि पलटी झाले. ही घटना घडताच रोड वरून जात असलेल्या लोकांनी मदत करून , पोलीसाना, १०८ रुग्ण वाहिकेला फोन करून जखमींना मानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रथिमक उपचार करून गंभीर १६ जखमींना वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले. यामध्ये प्रवीण भोयर,विशाल बोडखे,किसन डहाने,सुधाकर गावंडे,दीपक बोडखे,विष्णू बोडखे,किसन डहाणे,दादाराव बोडखे,गोविंद भोयर,चरण कुडवे,अतुल भोयर,प्रकाश भुजाडे,गजानन डहाने,दादाराव बोडखे,चंदन डहाने,कृष्णा अगलदरे यांचा समावेश आहे. इतर रुग्णावर मानाेरा येथे उपचार करण्यात येत आहे.