हरभरा काढणीसाठी शेतकºयांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:18 AM2021-02-21T05:18:33+5:302021-02-21T05:18:33+5:30

हरभरा काढणीसाठी शेतकºयांची लगबग इंझोरी: परिसरात गुरुवारी अवकाळी पाऊसही पडला असताना गेल्या दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले ...

About a gram of farmers for harvesting | हरभरा काढणीसाठी शेतकºयांची लगबग

हरभरा काढणीसाठी शेतकºयांची लगबग

Next

हरभरा काढणीसाठी शेतकºयांची लगबग

इंझोरी: परिसरात गुरुवारी अवकाळी पाऊसही पडला असताना गेल्या दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भिती असल्याने शेतकºयांनी हरभरा काढणीची लगबग सुरू केली आहे.

-----------

नियंत्रण सुटल्याने उलटली कार

इंझोरी: कारंजा-मानोरा मार्गावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास दापुरा-इंझोरीदरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. कारचे मात्र नुकसान झाले.

---------

वाहनांची कसून तपासणी

पोहरादेवी: जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता परजिल्ह्यातून येणाºया वाहनांची तपासणी केली जात आहे. यात मानोरा पोलिसांनी दिग्रसमार्गे यवतमाळ जिल्ह्यातून येणाºया वाहनांची तपासणी शनिवारी केली.

---------------

मानोºयात आणखी तीन बाधित

वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून, शुक्रवारी ९८ जण बाधित आढळले. त्यात मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील २, अंजनी येथील १ मिळून ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

Web Title: About a gram of farmers for harvesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.