नियुक्त्या नसतानाही सत्यप्रत साक्षांकित करणे भोवणार !
By admin | Published: July 20, 2016 02:02 AM2016-07-20T02:02:21+5:302016-07-20T02:02:21+5:30
शिक्क्याचा दुरुपयोग; अहवाल सादर करण्याचे निर्देश.
वाशिम: नियुक्ती झालेली नसतानाही सत्यप्रत साक्षांकित करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकार्यांचा शिक्का व स्वाक्षरीचा सर्रास वापर केला जात असल्याचे ह्यलोकमतह्ण स्टिंग ऑपरेशनने उघडकीस आणताच, महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेत चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश वाशिम तहसीलदारांना दिले आहेत. साक्षांकित प्रती सत्यप्रत करणे यासह अन्य काही कामांचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकार्यांकडे सोपविण्यात येतात. तत्कालीन काँग्रेस-राकाँच्या सरकारच्या काळात असलेल्या १४१४ विशेष कार्यकारी अधिकार्यांच्या सर्व नियुक्त्या जिल्हा प्रशासनाने ९ फेब्रुवारी २0१६ रोजी रद्द केल्या आहेत. विशेष कार्यकारी अधिकार्यांनी त्यांचे शिक्के प्रशासनाकडे जमा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. चार महिन्यानंतर विशेष कार्यकारी अधिकार्यांनी खरोखरच शासकीय शिक्के प्रशासनाकडे जमा केले की नाही, याची खातरजमा करण्यासाठी ह्यलोकमतह्णने १५ जुलै रोजी वाशिम शहरातील काही झेरॉक्स सेंटरवर स्टिंग केले. काही झेरॉक्स सेंटरवर विशेष कार्यकारी अधिकार्यांचे शिक्के मारून सत्यप्रत साक्षांकित करून देत असल्याचे निदर्शनात आले होते. ह्यलोकमतह्णचे वृत्त प्रकाशित होताच, अपर जिल्हाधिकार्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश वाशिम तहसीलदारांना दिले आहेत.