लसीकरणाच्या ठिकाणी डाॅक्टरांची गैहजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:23 AM2021-03-29T04:23:34+5:302021-03-29T04:23:34+5:30

लस घेतेवेळी कोणत्याही नागरिकांना त्रास झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुलजी जेठा हायस्कूल याठिकाणी नगर ...

Absence of doctors at the place of vaccination | लसीकरणाच्या ठिकाणी डाॅक्टरांची गैहजेरी

लसीकरणाच्या ठिकाणी डाॅक्टरांची गैहजेरी

Next

लस घेतेवेळी कोणत्याही नागरिकांना त्रास झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुलजी जेठा हायस्कूल याठिकाणी नगर परिषदेच्या सहकार्याने दुसरे कोविड लसीकरण सेंटर २८ मार्च रोजी सकाळी सुरू करण्यात आले. मात्र दुपारच्यावेळी या ठिकाणी लसीकरणाठी एक वृध्द गेले असता या ठिकाणी एएनएम जे.आर.भोने व जे.डब्यु बनारसे सह तीन नगर परिषद कर्मचारी या ठिकाणी हजर होते. यांच्याकडून लस घेतली मात्र कार्यरत असलेले डाॅक्टर या ठिकाणी हजर नव्हते. त्यामुळे लस घेणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या ठिकाणी लसीकरण वैद्यकीय अधिकारी डाॅ .पल्लवी लकडे यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र या ठिकाणी त्या हजर नव्हत्या.

Web Title: Absence of doctors at the place of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.