लॉकडाउनमुळे मुलगा अडकला इंदूरला; मुलीने वडिलांना दिला अग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:07 PM2020-04-19T17:07:51+5:302020-04-19T17:08:12+5:30

एकुलता एक मुलगा लॉकडाउनमुळे इंदूर येथून येऊ न शकल्याने लहान मुलगी रिमा हीने वडीलांना मुखाग्नी दिला. 

Absence of son, daughter perform funeral of Father | लॉकडाउनमुळे मुलगा अडकला इंदूरला; मुलीने वडिलांना दिला अग्नी

लॉकडाउनमुळे मुलगा अडकला इंदूरला; मुलीने वडिलांना दिला अग्नी

Next

- प्रफुल बानगावकर
कारंजा लाड (वाशिम) : कारंजा नगर परिषदेचे शिपाई ज्ञानेश्वर जाधव यांचा १५ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू झाला. वडिलांच्या अत्यसंस्कारासाठी एकुलता एक मुलगा लॉकडाउनमुळे इंदूर येथून येऊ न शकल्याने लहान मुलगी रिमा हीने वडीलांना मुखाग्नी दिला. 
कोरोना विषाणू ससंर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहिर केला. लॉकडाउनमुळे कोणत्या नातेवाईकाकडे किंवा कुटूंबातील कुणाचे निधन झाले तरी येता-जाता येत नाही अशी स्थिती आहे. कारंजा नगर परिषदचे शिपाई ज्ञानेश्वर गणपतराव जाधव यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने १५ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांना अक्षय नावाचा एकुलता एक मुलगा व दोन मुली आहेत. कामानिमित्त अक्षय हा इंदूर (मध्य प्रदेश) येथे असल्याने वडीलांच्या अंत्यसंस्कारासाठी येण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, लॉकडाउनमुळे त्याला कारंजा येथे येणे शक्य झाले नाही. शेवटी लहान मुलगी रिमा हीने वडीलांला मुखाग्नी दिला. मुलगा हा वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी येऊ शकला नसल्याने किमान दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी २४ एप्रिल रोजी त्याला कारंजा येथे येण्यासाठी रितसर परवानगी द्यावी अशी विनंती व मागणी मृतक जाधव यांच्या पत्नी व दोन मुलींनी कारंजाचे तहसिलदार धीरज मांजरे यांच्याकडे केली. शिंदे कुटुंबियाच्यावतीने शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश बाबरे यांनीदेखील तहसिलदार व कारंजा पोलीस स्टेशनकडे अर्ज करून मृतकाच्या मुलाला कारंजा येथे येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

Web Title: Absence of son, daughter perform funeral of Father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.