क्षय रुग्णांची नोंदणी करण्यास गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:59+5:302021-05-14T04:40:59+5:30

00000 नवीन रेशन कार्डवर धान्य मिळेना ! वाशिम : रिसोड, वाशिम, कारंजा तालुक्यातील नवीन रेशनकार्ड धारकांना अद्याप स्वस्त धान्याचा ...

Accelerate the registration of tuberculosis patients | क्षय रुग्णांची नोंदणी करण्यास गती द्या

क्षय रुग्णांची नोंदणी करण्यास गती द्या

Next

00000

नवीन रेशन कार्डवर धान्य मिळेना !

वाशिम : रिसोड, वाशिम, कारंजा तालुक्यातील नवीन रेशनकार्ड धारकांना अद्याप स्वस्त धान्याचा पुरवठा सुरू झाला नाही. स्वस्त धान्य पुरवठा होण्यासाठी शासनाने स्वतंत्र आदेश पारित करावा, अशी मागणी रेशनकार्ड धारकांनी गुरूवारी केली.

0000

किन्हीराजा येथे ४ कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम : आरोग्य विभागातर्फे १३ मे रोजी प्राप्त अहवालानुसार किन्हीराजा (ता. मालेगाव) येथे आणखी ४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी सुरू केली.

00

शुल्कात सवलत देण्याची मागणी

वाशिम : यंदा कोरोनामुळे अध्ययन - अध्यापन प्रक्रिया प्रभावित झालेली आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्यक्ष शिक्षण बंदच आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात असून, विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क पूर्णपणे वसूल केले जात आहे. पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

00000

सहकार क्षेत्रातील निवडणूक लांबणीवर ?

वाशिम : जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सहकार क्षेत्रातील शिक्षक पतसंस्था व अन्य पतसंस्थांची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर ही अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

000

खड्ड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय

वाशिम : वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील कोविड केअर सेंटरजवळील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. सिव्हिल लाईन कडून जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गाकडे वळणाच्या ठिकाणीच खड्डे असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांनी गुरूवारी केली.

0000

रुग्णसंख्येने धोत्रा येथे वाढली चिंता

वाशिम : धोत्रा देशमुख (ता. कारंजा) येथे आणखी ११ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे १३ मे रोजी निष्पन्न झाले. बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.

०००००

शेती मशागतीची कामे पूर्णत्वाकडे

वाशिम : तोंडगाव परिसरात शेतात नांगरणीसह इतर शेती मशागतीची कामे जोमात सुरू आहेत. मात्र, डिझेलच्या दरवाढीचा फटका सरळ शेतीच्या मशागतीस बसला असून, याचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

00

रिसोड शहरात निर्जंतुकीकरण (फोटो)

रिसोड : रिसोड शहरातील वाशिम नाका चेक पोस्ट येथे नगर परिषदेच्या वतीने १३ मे रोजी निर्जंतुकीकरण करण्यात आले. रिसोड शहरातही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांची चिंता वाढत आहे. नगरपरिषद तर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

०००००००००००००००००००००

कारंजात गुटखा विक्री पुन्हा सुरू

वाशिम : कारंजा शहरात गुटखा विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. असे असताना सुद्धा कारंजात खुलेआम गुटखा विक्री सुरु असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

०००००

अनसिंग येथे आरोग्य तपासणी

वाशिम : वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १३ मे रोजी पॉझिटिव्ह आला असून, आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली. बाधितांच्या संपर्कातील संदिग्ध नागरिकांचे स्वॅब घेतले जाणार आहेत.

००००००००

दुष्काळी सवलतींचा लाभ देण्याची मागणी !

वाशिम : जिल्ह्यातील गावाची खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी सरासरी ४५ पैसे आल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे केली.

Web Title: Accelerate the registration of tuberculosis patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.