औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रक व लक्झरी बसची धडक; तीन जन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:47 PM2018-06-27T17:47:04+5:302018-06-27T17:49:35+5:30

किन्हीराजा :- लक्झरी व ट्रकच्या समोरासमोर झालेल्या अपघातात लक्झरीचे चालक व वाहकासह ट्रकचा चालक मिळून तिघे गंभीर झाले.

Accident on Aurangabad-Nagpur highway; Three people serious | औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रक व लक्झरी बसची धडक; तीन जन गंभीर

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रक व लक्झरी बसची धडक; तीन जन गंभीर

Next
ठळक मुद्दे ही घटना औरंगाबाद-नागपूर महामार्गावर बुधवारी सकाळी २.३० वाजता किन्हीराजा पासून तीन कीलोमीटर अंतरावर घडली.  या अपघातामुळे रात्री ३ वाजतापासून सकाळी ९ वाजेपर्यन्त या मार्गावरील वाहतुक बंद होती. या अपघातात लक्झरीचा चालक गज्जफ्फर खान (४८), राजू शिंदे (४०), रा.  दोघेही रा. औरंगाबाद हे गंभीर जखमी झाले असून, ट्रकचा चालक जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क 

किन्हीराजा :- लक्झरी व ट्रकच्या समोरासमोर झालेल्या अपघातात लक्झरीचे चालक व वाहकासह ट्रकचा चालक मिळून तिघे गंभीर झाले. ही घटना औरंगाबाद-नागपूर महामार्गावर बुधवारी सकाळी २.३० वाजता किन्हीराजा पासून तीन कीलोमीटर अंतरावर घडली.  या अपघातामुळे रात्री ३ वाजतापासून सकाळी ९ वाजेपर्यन्त या मार्गावरील वाहतुक बंद होती. त्यामुळे वाहनांची दोन्ही बाजूंनी ५ कीलोमीटर पर्यंत रांग लागली होती.शेवटी पोलीस व इतरही वाहनचालकांनी ट्रक बाजूला सारुन वाहतूक सुरु केली.

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर मंगळवार २६ जून रोजी रात्री किन्हीराजा ते मालेगाव रोडवरील खोकड तलाव शिवारातून एम एच २० डीडी ८०८ क्रमांकाची लक्झरी बस  मालेगावमार्गे नागपूरकडे जात होती, जीजी ०७ आरडी ६४१४ क्रमांकाचा ट्रक मालेगावकडून भरधाव वेगाने किन्हीराजाकडे येत होता. त्याचवेळी खोकडतलाव शिवारात बिघाड झालेला ट्रक ओडी ११एफ ७२३७ क्रमांकाचाा ट्रक उभा होता. हा ट्रक उभा आहे की मार्गावर धावत आहे. याचा अंदाज आला नाही व प्रत्यक्ष ट्रकजवळ पोहोचल्यानंतर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात जीजी ०७ आरडी ६४१४ क्रमांकाचा ट्रक व लक्झरीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात लक्झरीचा चालक गज्जफ्फर खान (४८), राजू शिंदे (४०), रा.  दोघेही रा. औरंगाबाद हे गंभीर जखमी झाले असून, ट्रकचा चालक जखमी झाला. या अपघातामुळे ३ वाजतापासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत तब्बल सहा तास औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार किरणकुमार साळवे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळ गाठून जमादार संतोष कोहर  ज्ञानेश्वर राठोड यांच्यासह वाहतूकशाखा जऊळकाचे पोलीस व जमा झालेल्या वाहनांचे चालक व वाहकाने ट्रकला लोटून बाजूला केले व वाहतूक सुरळीत केली

Web Title: Accident on Aurangabad-Nagpur highway; Three people serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.