नायब तहसिलदारांच्या वाहनाला अपघात; तीन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:43 PM2019-04-12T17:43:19+5:302019-04-12T17:44:13+5:30
मेडशी : मालेगाव तहसिलचे नायब तहसिलदार रवी गणपत राठोड (४५) यांच्या खासगी वाहनाला अपघात झाल्याची घटना अकोला ते वाशिम महामार्गावरील मेडशी येथील ३३ केव्ही उपकेंद्राच्याजवळ असलेल्या वळणावर १२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेडशी : मालेगाव तहसिलचे नायब तहसिलदार रवी गणपत राठोड (४५) यांच्या खासगी वाहनाला अपघात झाल्याची घटना अकोला ते वाशिम महामार्गावरील मेडशी येथील ३३ केव्ही उपकेंद्राच्याजवळ असलेल्या वळणावर १२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये तीन नायब तहसिलदार जखमी झाले आहेत.
निवडणुकीच्या कामानिमित्ताने १२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान मालेगावचे नायब तहसिलदार रवि गणपत राठोड हे एम.एच ३७ जी ७२७७ क्रमांकाच्या खासगी वाहनाने रिसोडला जात होते. या वाहनात रवि राठोड यांच्यासह मालेगावचे नायब तहसिलदार रामचंद्र हातेकर (५६), मनोज श्रीराम कडू (५०) सर्व रा. अकोलादेखील होते. सर्वजण अकोल्यावरून रिसोडला जात होते. दरम्यान, मेडशी येथील ३३ केव्ही उपकेंद्राजवळील वळणावर या कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामध्ये तिनही नायब तहसिलदार जखमी झाले. मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर जखमींना अकोला येथे खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. पुढील तपास मेडशी चौकीचे पोलीस करीत आहेत.