रिसोड-मेहकर मार्गावर काळी-पिवळी उलटली; एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 05:27 PM2018-01-29T17:27:04+5:302018-01-29T17:29:02+5:30
रिसोड - खासगी प्रवासी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. यामध्ये रमेश मोतीराम देशमाने (६२) रा. वाकद हे जागीच ठार झाले. ही घटना रिसोड ते मेहकर मार्गावरील मोठेगाव गावानजीक सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

एमएच २८ एच १७३४ क्रमांकाच्या खासगी प्रवासी (काळी पिवळी) वाहनाने चार ते पाच प्रवासी रिसोडवरून मेहकरकडे जात होते. दरम्यान, मोठेगाव गावाजवळ समोरून येणाºया मोटारसायकलमुळे खासगी प्रवासी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. सदर वाहन दोन ते तीन वेळा उलटल्याने यामध्ये रमेश देशमाने हे दबल्या गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अन्य प्रवाशांनादेखील किरकोळ मार लागला. घटनेची माहिती मिळताच रस्त्यावरील नागरिकांनी अपघातग्रस्त वाहन सरळ केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून रमेश देशमाने यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी देशमाने यांना मृत घोषित केले. मृतक रमेश देशमाने यांच्या मुलाचा २८ जानेवारीलाच साखरपुडा झाला होता. अपघाती निधनाने देशमाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या अपघातप्रकरणी पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.