व-हाडाच्या कारला अपघात; दोन ठार

By admin | Published: April 3, 2017 02:15 AM2017-04-03T02:15:07+5:302017-04-03T02:15:07+5:30

रोही मार्गावर आडवा आल्याने कारची धडक लागून झालेल्या अपघातात रोही आणि कारमधील दोघे ठार झाले.

Accident of a Vaharda car; Two killed | व-हाडाच्या कारला अपघात; दोन ठार

व-हाडाच्या कारला अपघात; दोन ठार

Next

धनज बु. (वाशिम), दि. २- रोही मार्गावर आडवा आल्याने कारची धडक लागून झालेल्या अपघातात रोही आणि कारमधील दोघे ठार झाले.
ही घटना कारंजा तालुक्यातील धनज बु. नजिक असलेल्या माळेगावफाट्यानजिक सकाळी १0 वाजताच्या सुमारास घडली. विजेंद्र ठाकरे (३0) आणि गजानन चवतमोल (३0) अशी मृतकांची नावे असून, गंभीर जखमींपैकी अत्यवस्थ असलेल्या एकाला नागपूर येथे हलविण्यात आले, तर दुसर्‍यावर अमरावती येथे उपचार सुरू आहेत.
वाशिम जिल्ह्यातील चौघे जण एमएच-३0 एके-१२८२ क्रमांकाच्या कारने कारंजाहून अमरावती जिल्ह्यातील नेर पिंगळे येथे लग्नासाठी जात होते. कारंजा तालुक्यातील धनज बु. नजिक असलेल्या माळेगाव फाट्यानजिक अचानक रोही कारच्या आडवा आल्याने कारची रोहीला जबर धडक बसली. कारच्या धडकेत रोही ठार झाला, तसेच कारमधील वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव येथील विजेंद्र ठाकरे (३0) आणि रिधेरा येथील गजानन चवतमोल (३0) हे दोघेही घटनास्थळीच ठार झाले. त्याशिवाय विशाल घेवारे आणि कारचालक पवन काकडे हे दोघे जखमी झाले. त्यामधील पवन काकडे यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले, तर विशाल घेवारेवर अमरावती येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणाची नोंद कारंजा पोलिसांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यास मदत केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Accident of a Vaharda car; Two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.