अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भाविकांच्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 03:10 AM2017-12-29T03:10:14+5:302017-12-29T03:15:38+5:30
मेडशी: भाविकांना घेऊन जात असलेला ट्रक अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर उलटला. या अपघातात ६ महिला भाविक जखमी झाल्या. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेडशी: भाविकांना घेऊन जात असलेला ट्रक अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर उलटला. या अपघातात ६ महिला भाविक जखमी झाल्या. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
परभणी जिल्ह्यातील जवळपास भाविक गोंदिया जिल्ह्यातील डाकराम तालुक्यातील सुकळी येथून नागपूर येथे १६ डिसेंबर रोजी पदयात्रेद्वारे नागपूर येथे गेले होते. तेथून २७ डिसेंबर रोजी परत येत असताना दोन वाहनांची वाट चुकली आणि ते सरळ अमरावती येथून वाशिममार्गे परभणीकडे न जाता अकोला गेले. तेथून परत वाशिमकडे येत असताना २८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास यातील एमएच-२० डब्ल्यू-८२५५ या टाटा पिकअप वाहनाचा टायर निखळून पडल्याने सदर वाहन मालेगाव तालुक्यातील मेडशीनजिक उलटले. या अपघातात रेणुका शिंदे (३०) रा शेलू. ता. पालम, जिल्हा परभणी, अर्चना बळीराम शिंदे (३५), रा. पालम, सुरेखा मेकेवाळ (२५) रा.कोळवाडी, ता.पालम, सुलोचना भोसले (३५) रा.विसाद ता.गंगाखेड जि.परभणी, रंजना भोसले (४०) रा. विसाद, मालनबाई मेकेवाळ (४५), रा.कोळवाडी या महिला भाविकांना दुखापत झाली. त्या सर्वांना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले, अशी माहिती या पदयात्रेत सहभागी असलेले महानुभाव पंथी बाबुराज येळमकर यांनी दिली.