लेखा कर्मचारी सामूहिक रजेवर
By admin | Published: July 5, 2014 12:47 AM2014-07-05T00:47:24+5:302014-07-05T01:00:19+5:30
वाशिम जिल्हा परिषदेअंतर्गमत सर्व विभागातील लेखा कर्मचार्यांनी ४ जुलैपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे.
वाशिम : लेखा संवर्गाची बिंदू नामावली मंजुर करुन घेऊन रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी वाशिम जिल्हा परिषदेअंतर्गमत सर्व विभागातील लेखा कर्मचार्यांनी ४ जुलैपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाचा जिल्हापरिषदेतील लेखा विभागासह अन्य विभागातील लेखा व्यवहारांवर परिणाम होत आहे.
२७ नोव्हेंबर २00९ रोजी लेखा संवर्गीय बिंदू नामावलीला मागासवर्गीय कक्ष उप आयुक्त अमरावती यांच्याकडून मंजुरी प्रदान झालेली आहे. त्यानुषंगाने ७ नोव्हेंबर २0१२ ला सदर बिंदू नामावलीस तीन वष्रे पुर्ण झाली आहेत. बिंदू नामावलीचा नवीन प्रस्ताव तयार करुन उपायुक्तांकडून मंजुरी घेण्ो आवश्यक होते. त्यानुसार वित्त विभागाने मागासवर्गीय कक्षाकडे प्रस्ताव सादर केलेला असताना २७ नोव्हेंबर २0१२ ते आतापर्यंत दोन वर्षाचा कालावधी पुर्ण होत आहे, तरीसुध्दा वित्त विभागाची बिंदू नामावली मंजूर झालेली नाही. बिंदू नामावली मंजुर झालेली नसल्यामुळे वित्त विभागातील रिक्त पदे पदोन्नतीने, सरळसेवेने भरणे शक्य होत नाही.परिणामी रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कर्मचार्यांवर अतिरिक्त प्रभाराचा बोजा पडत आहे.त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर तसेच कर्मचार्यांच्या प्रकृतीवर होत आहे.याबाबीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्यावतीने वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते. याबाबत संघटनेने उपरोक्त संदर्भान्वये वारंवार पत्रव्यवहार करुन तथा भेटी देऊन पाठपुरावा करून तसेच बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.परंतु प्रशासनाने दिलेल्या आश्वासनामुळे सदर आंदोलन स्थगित ठेवण्यात आले होते. परंतु याबाबत अद्यापपर्यंत काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेने सर्वानुमते ४ जुलै ते ११ जुलैपर्यंत सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय संघटनेच्या सभेत घेण्यात आला होता.त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन देऊनही मागण्यांची पुर्तता न झाल्यामुळे संघटनेच्या पदाधिकार्यांसह कर्मचारी ४ जुलैपासून सामूहिक रजेवर गेले आहेत.यामध्ये जि.प.लेखा विभागातील २0 कर्मचार्यांसह अन्य विभाग व पंचायत समित्यांमधील लेखा कर्मचार्यांचा समावेश आहे.यामुळे जिल्हापरिषद लेखा विभागात ४ जुलै रोजी शुकशुकाट पसरलेला होता.या आंदोलनाचा परिणाम जिल्हापरिषदेतील लेखा विभागासह अन्य विभागांमधील तसेच पंचायत समित्यांमधील लेखाविषयक कामकाजावर झाला.हे आंदोलन ११ जुलैपर्यत सुरुच राहील अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना जिल्हा शाखेचे अध्यक्ष रा.रा.ढंगारे यांनी दिली आहे.