लेखाविषयक कामकाज खोळंबले!

By admin | Published: March 19, 2017 02:34 AM2017-03-19T02:34:44+5:302017-03-19T02:34:44+5:30

जिल्हा परिषद लेखा संवर्गातील कर्मचा-यांच्या आंदोलनात तोडगा नाही!

Accounting workings will be lost! | लेखाविषयक कामकाज खोळंबले!

लेखाविषयक कामकाज खोळंबले!

Next

वाशिम, दि. १८- विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषद लेखा संवर्गीय कर्मचार्‍यांनी १५ मार्चपासून पुकारलेले लेखणी बंद आंदोलन अद्याप सुरूच असल्याने जिल्हा परिषदेचे लेखाविषयक कामकाज ठप्प पडले आहे. ऐन 'मार्च एन्डिंग'मध्ये लेखा कर्मचार्‍यांची 'लेखणी'बंद झाल्याचा फटका प्रशासकीय कामकाजाला मोठय़ा प्रमाणात बसत आहे.
लेखा कर्मचार्‍यांना राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांप्रमाणे ग्रेड पे वरिष्ठ सहायक लेखा कर्मचार्‍यांना ४00 रुपये व सहायक लेखा अधिकारी यांना १00 रुपये वाढवून मिळावा, ग्रेड पे राज्य शासन कर्मचार्‍यांना ज्या दिनांकापासून मंजूर करण्यात आला, त्या दिनांकापासून मंजूर करण्यात यावा व यात झालेला भेदभाव संपुष्टात आणावा, जिल्हा कोषागार व उपकोषागार कार्यालयाप्रमाणे गट स्तरावर लेखा विभागाचे कामकाज करण्यात यावे, गट स्तरावर सहायक लेखाधिकारी यांना विशेष वित्तीय अधिकार देण्यात यावे, पंचायत समिती स्तरावर लेखा अधिकारी वर्ग-२ चे पद निर्माण करणे आदी मागण्या शासन स्तरावर करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही सकारात्मक निर्णय न झाल्याने राज्य स्तरावर विविध टप्प्यात आंदोलन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात १0 ते १४ मार्चदरम्यान काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात १५ मार्चपासून कार्यालयात उपस्थित राहून लेखणी बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. अद्याप या आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याने आंदोलन सुरूच आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे लेखाविषयक कामकाज ठप्प पडले आहे. दरम्यान, या आंदोलनाला जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला असून, लेखा संवर्गातील सर्व कर्मचारी सहभागी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा वाशिमचे अध्यक्ष रामानंद ढंगारे यांनी दिली.
लेखा कर्मचारी संघटनेच्या या आंदोलनाला जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, सभापती सुधीर पाटील गोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, योगेश जवादे, महेश पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नीलेश राठोड आदींनी भेट देऊन चर्चा केली.

Web Title: Accounting workings will be lost!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.