लेखाविषयक कामकाजाचा खोळंबा!
By admin | Published: March 17, 2017 02:47 AM2017-03-17T02:47:06+5:302017-03-17T02:47:06+5:30
जिल्हा परिषद कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन : प्रलंबित प्रश्नांच्या पूर्ततेची मागणी
वाशिम, दि. १६- शासन स्तरावर प्रलंबित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेतील लेखासंवर्गीय कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे मात्र त्यांच्या अखत्यारित येणार्या सर्वच कामांचा खोळंबा झाला असून १७ मार्च रोजी होणार्या स्वउत्पन्न अंदाजपत्रक सभेलाही अनुपस्थित राहणार असल्याचे संबंधित कर्मचार्यांनी प्रशासनाला कळविले आहे.
सहायक लेखा अधिकार्यांना शासकीय कर्मचार्यांप्रमाणे राजपत्रित दर्जा देण्यात यावा, राज्य शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणे ह्यग्रेड पेह्ण वरिष्ठ सहायक लेखा कर्मचार्यांना ४00 रुपये व सहायक लेखा अधिकारी यांना १00 रुपये वाढवून मिळावा, ग्रेड पे राज्य शासन कर्मचार्यांना ज्या दिनांकापासून मंजूर करण्यात आला, त्या दिनांकापासून मंजूर व्हावा व यात झालेला भेदभाव संपुष्टात आणावा, जिल्हा कोषागार व उपकोषागार कार्यालयाप्रमाणे गटस्तरावर लेखा विभागाचे कामकाज करण्यात यावे, गटस्तरावर सहायक लेखाधिकारी यांना विशेष वित्तीय अधिकार देण्यात यावे, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग - ३ ची परीक्षा दरवर्षी नियमित घेणे, जिल्हा परिषद अंतर्गत लेखा कर्मचार्यांचे जॉब चार्ट तयार करणे, पंचायत समिती स्तरावर लेखा अधिकारी वर्ग-२ चे पद निर्माण करणे आदी मागण्या शासन स्तरावर करण्यात प्रलंबित आहेत. त्याच्या पूर्ततेसाठी विविध टप्प्यात आंदोलन केले जात आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात १0 ते १४ मार्चदरम्यान काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. दुसर्या टप्प्यात १५ मार्चपासून कार्यालयात उपस्थित राहून लेखणी बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारच्या लेखणी बंद आंदोलनात लेखा संवर्गातील सर्व कर्मचारी सहभागी होते.