वाशिम जिल्ह्यातील  शिक्षकांच्या ‘पीएफ’चा हिशोब प्रलंबितच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 02:38 PM2017-12-18T14:38:05+5:302017-12-18T14:39:42+5:30

वाशिम: जिल्ह्यांतर्गत येणाºया सर्व प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात होणाºया भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) हिशोब मिळेनासा झाला आहे. गेल्या मार्च २०१६ पासून शिक्षकांना त्यांच्या वेतनातून पीएफसाठी करण्यात आलेल्या कपातीच्या पावत्याच मिळाल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. 

The accounts of teachers' PF in Washim district are pending | वाशिम जिल्ह्यातील  शिक्षकांच्या ‘पीएफ’चा हिशोब प्रलंबितच 

वाशिम जिल्ह्यातील  शिक्षकांच्या ‘पीएफ’चा हिशोब प्रलंबितच 

Next
ठळक मुद्देप्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात होणाºया भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) हिशोब मिळेनासा झाला आहे. भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये मार्च २०१६ पासून किती निधी जमा झाला. त्याच्या पावत्याच अद्याप शिक्षकांना मिळाल्या नाही.

 

वाशिम: जिल्ह्यांतर्गत येणाºया सर्व प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात होणाºया भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) हिशोब मिळेनासा झाला आहे. गेल्या मार्च २०१६ पासून शिक्षकांना त्यांच्या वेतनातून पीएफसाठी करण्यात आलेल्या कपातीच्या पावत्याच मिळाल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. 

भविष्य निर्वाह निधी म्हणजे सर्वसाधारणपणे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्याला उर्वरित आयुष्यात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मिळणारी रक्कम होय. तथापि, ही रक्कम शिक्षक कर्मचाºयांच्याच वेतनातून दरमहा निश्चित केल्यानुसार कपात करून भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा करण्यात येत असते. सदर निधीतून काही रक्कम गरजेनुसार वेळोवेळी काढण्याचा अधिकारही शिक्षकांना असतो.  शिक्षक किंवा शासकीय कर्मचाºयांच्या नियमित होणाºया वेतनातून भविष्य निर्वाह निधी म्हणून कपात करण्यात येणाºया रकमेचा वापर कौटुंबिक जबाबदाºया पार पाडण्याच्या हेतूने, ज्यामध्ये कौटुंबिक आरोग्य मुलांचे शिक्षण, कौटुंबिक, वैवाहिक, जबाबदाऱ्या, आकस्मिक वैद्यकीय खर्च या पूर्ण करण्यासाठी संबंधीत कर्मचारी किंवा शिक्षक करीत असतात. काही अपरिहार्य कारणात्सव शासकीय कर्मचारी, अथवा शिक्षकांना या निधीतून रक्कम काढावयाची असल्यास त्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात किती रक्कम जमा झाली हे माहित असणे आवश्यक असते; परंतु जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत येणाºया प्राथमिक शिक्षक संवर्गातील शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधी हा त्यांच्या खात्यामध्ये मार्च २०१६ पासून किती निधी जमा झाला. त्याच्या पावत्याच अद्याप शिक्षकांना मिळाल्या नाही. यासाठी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शिक्षण विभागाकडे वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली. मात्र, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आता दुसरे आर्थिक वर्ष संपत आले तरी, मागील वर्षीच्या पावत्याच मिळाल्या नसल्याने आपल्या खात्यात प्रत्यक्ष किती रक्कम जमा झाली किंवा रक्कम जमा झाली की नाही, हे शिक्षकांना कळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शिक्षक वर्गात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: The accounts of teachers' PF in Washim district are pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.