आरोपिकडून हत्त्येची कबुली

By admin | Published: May 19, 2017 07:44 PM2017-05-19T19:44:12+5:302017-05-19T19:44:12+5:30

पसरणी उपसरपंच हत्त्या प्रकरण : हत्त्येमागील कारणे व खऱ्या सुत्रधाराचा शोध सुरु

Accused of accepting hat | आरोपिकडून हत्त्येची कबुली

आरोपिकडून हत्त्येची कबुली

Next
ऑनलाइन लोकमत
 

कारंजा लाड : तालुक्यातील पसरणी येथील ३८ वर्षीय उपसरपंच विलास पोटपीटे यांच्या हत्येप्रकरणात  १८ मे रोजी पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या मेहबूब मदन चौधरी याने हत्येची कबुली दिली आहे. या हत्या प्रकरणात कोण कोण खरे सुत्रधार आहेत, खुनाचे नेमके कारण काय,  या गोप्टीचा शोध घेण्यासाठी कारंजा पोलीस तपास करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी दिली.
अटक केलेल्या आरोपिकडून   हत्येमागणी कारणे व खरा सुत्रधार शोधण्याच्या तपास सुरू आहे. येत्या दोन दिवसात पसरणी उपसरपंच विलास पोटपिटे यांच्या खुनामागील खरा सुत्रधार पुढे येईल असा विश्वास पोलीस विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 
विलास पोटपिटे यांचा खून वेगळया पध्दतीने करून  त्यांचा मोबाईल व ईतर कागदपत्रे घटनास्थळाहून काही अतंरावर म्हणजेच इंझोरी रस्त्यावरील पुलावर फेकुण दिल्याची माहीती देणारा पसरणी येथील मेहबुब मदन चौधरी या युवकाला १८ मे रोजी अटक केल्यामुळे खरा खुनी कोण व कश्यासाठी विलास पोटपिटे यांचा खुन झाला हे शोधणे पोलीसांना कठीन नसल्याचे बोलल्या जात आहे. मात्र या खुनामागे राजकीय प्रतिप्ठांचा सहभाग असल्याच्या सुगाव्यामुळे पोलीस गुप्तता पाळत असतांनी ही पोलीसावर राजकीय दबात तंत्र येत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. तथापि, पोलिसांना या घटनेचे गूढ उकलण्यात यश आले असून, हत्या घडवून आणण्यात कुणाकुणाचा सहभाग होता?, हत्येमागील खरे कारण काय होते यांचा शोध पोलीस घेत आहे.
कारंजा पोलीसांनी अटक केलेल्या महेबुब चौधरी यांच्या सांगण्यानुसार पोलीसांनी चार ते पाच व्यक्तीची कसून चैकशी केली. दरम्यान त्याला १८ मे रोजी न्यायालयात हजर केले असता विद्यमान न्यायाधिशांनी त्याला २३ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
वाशिम पोलीस अधिक्षका मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले तपास करीत आहे. यांना सहकार्य पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन व पोलीस कर्मचारी  सहकार्य करीत आहे. 

Web Title: Accused of accepting hat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.