शाळकरी मुलीस फूस लावून पळविणा-या आरोपीस अटक
By admin | Published: November 6, 2014 01:20 AM2014-11-06T01:20:15+5:302014-11-06T01:37:12+5:30
रिसोड तालुक्यातील घटना.
Next
वाशिम : रिसोड तालुक्यातील एका गावातील एका १७ वर्षीय शाळकरी मुलीला फूस लावून पळवून नेणार्या आरोपीस ५ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अटक केली. १७ वर्षीय मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली होती. यासंदर्भात पीडित मुलीच्या पित्याने पोलिसांत तक्रार देऊन आपल्या मुलीस फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून रिसोड पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला व यातील मुख्य आरोपी उमेश प्रल्हाद आंधळे पोलिसांच्या आज ५ नोव्हेंबर रोजी स्वाधीन झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.