वाशिम येथे पोलिसांना गुंगारा देऊन आरोपीचे पलायन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 09:55 PM2017-11-24T21:55:38+5:302017-11-24T22:00:45+5:30
चोरीच्या घटनेतील आरोपीने दोन पोलीसांना गुंगारा देऊन पोबारा केल्याची घटना २३ व २४ नोव्हेंबरच्या दरम्यान वाशिम येथे घडली. याप्रकरणी दोन पोलीसांसह एका अज्ञात इसमाविरूध्द शहर पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: चोरीच्या घटनेतील आरोपीने दोन पोलीसांना गुंगारा देऊन पोबारा केल्याची घटना २३ व २४ नोव्हेंबरच्या दरम्यान वाशिम येथे घडली. याप्रकरणी दोन पोलीसांसह एका अज्ञात इसमाविरूध्द शहर पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
मालेगाव येथील सराईत गुन्हेगार गणेश सखाराम बांगर याला न्यायालयामधून कारागृहात नेण्यासाठी पोलीस शिपाई शिवाजी माणिक केंद्रे व विजय लक्ष्मण ढोरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. दरम्यान, आरोपीस कारागृहात नेत असताना बहिणीला भेटण्याचे कारण समोर करून पोलीसांच्या हातावर तुरी देऊन बांगरने पोबारा केला. बांगर याला पळवून नेण्यासाठी दिलीप दिनकर हरकळ (रा. गोभणी) याने मदत केल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार बाबुसिंग रतन राठोड यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलीस शिपाई शिवाजी केंद्रे, विजय ढोरे व खासगी ईसम दिलीप हरकळ या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.