खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:38 AM2021-04-03T04:38:38+5:302021-04-03T04:38:38+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गायकवाड यांचा मृतदेह देवराव सावळे यांच्या शेतातील विहिरीत ३१ मार्च रोजी आढळला होता. पोलिसांनी मृतदेह ...

Accused of murder arrested | खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक

Next

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गायकवाड यांचा मृतदेह देवराव सावळे यांच्या शेतातील विहिरीत ३१ मार्च रोजी आढळला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात गायकवाड यांचा मृत्यू हा गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. अधिक चाैकशी केली असता, ३० मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास लक्ष्मण गायकवाड हे गावातीलच दादाराव अर्जुन खंडारे व सुनील रमेश इंगोले या दोघांसोबत मोटारसायकलवर बसून पार्टी करण्याकरिता देवराव सावळे यांच्या शेतात गेले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी पार्टी सुरू असताना, दादाराव खंडारे व सुनील इंगोले हे लक्ष्मण गायकवाड यांना शिवीगाळ करून मारहाण करीत होते, ही घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळून आले. त्यावरून पोलिसांनी दादाराव खंडारे व सुनील इंगोले यांचा शोध घेऊन दोघांनाही ताब्यात घेतले. आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. फिर्यादी संदीप गायकवाड (रा.अमानी) यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून दोन्ही आरोपींवर १ एप्रिल रोजी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये भादंविचे कलम ३०२, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि तडसे करित आहेत.

पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, सपोनि गजानन तडसे, पोहेकाँ कैलास कोकाटे, गणेश बियाणी, गजानन झगरे, समाधान वाघ यांनी सदर प्रकरण उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

Web Title: Accused of murder arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.