जऊळका येथील चोरी प्रकरणातील आरोपी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:41 AM2021-09-19T04:41:47+5:302021-09-19T04:41:47+5:30

वाशिम : जिल्ह्यात अलीकडच्या काळात चोरी, दरोड्याच्या घटनांत वाढ झाली असून, जऊळका रेल्वे येथील चोरी प्रकरणातील तीन आरोपी पकडण्यात ...

The accused in the theft case at Jaulka was caught | जऊळका येथील चोरी प्रकरणातील आरोपी पकडले

जऊळका येथील चोरी प्रकरणातील आरोपी पकडले

Next

वाशिम : जिल्ह्यात अलीकडच्या काळात चोरी, दरोड्याच्या घटनांत वाढ झाली असून, जऊळका रेल्वे येथील चोरी प्रकरणातील तीन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आहे. मात्र, चोरीच्या उर्वरित घटनांमधील चोरट्यांना जेरबंद केव्हा करणार, असा प्रश्न जिल्हावासीयांमधून उपस्थित केला आहे.

नागपूर ते मुंबई द्रुतगती महामार्गावर जऊळका रेल्वे बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर कलादिग्दर्शक लिलाधर सावंत यांच्या घरी ११ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान चोरी झाली होती. या घटनेत जवळपास ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेत वापरलेल्या वापरण्यात आलेल्या दुचाकीसंदर्भात गुप्त माहिती मिळाल्यावरून जऊळका हद्दीत व संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. पोलीस स्टेशन वाशिम हद्दीत काटा रोड येथे पोलिसांनी शिताफीने चोरट्यांना पकडले. अरुण मदन चव्हाण (२१) रा.बिबखेडा, ता.रिसोड, करण पंन्यास भोसले (२५) रा.परतापूर, ता.मेहकर, शीखलाल मोतीराम पवार (४२) रा.सुकळी, ता.मेहकर या आरोपींनी चोरीची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जऊळका रेल्वेचे पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे व वाशिम ग्रामीणचे ठाणेदार विनोद झळके आणि चमूने आरोपी पकडण्याची कारवाई केली. दरम्यान, अलीकडच्या काळात जिल्ह्यात चोरीच्या काही घटना घडल्या असून, यामधील चोरट्यांना जेरबंद केव्हा करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

०००००

चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती

शहरासह ग्रामीण भागातही चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रात्रगस्त वाढविणे आवश्यक ठरत आहे. नागरिकांनीही बाहेरगावी जाताना घर कुलूपबंद करण्यापूर्वी शेजारचे किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती देणे अपेक्षित आहे.

Web Title: The accused in the theft case at Jaulka was caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.