आरोपीची कारागृहात रवानगी
By admin | Published: June 4, 2014 01:19 AM2014-06-04T01:19:30+5:302014-06-04T01:24:37+5:30
५५ वर्षे वयाच्या आरोपीस वनविभागाच्या कर्मचार्यांनी अटक; त्या आरोपीची कारागृहात रवानगी
वाशिम : नजीकच्या जांभरुण नावजी परिसरात २ जूनच्या सकाळी ६ वाजता शिकार करुन त्याचे मांस घेउन जाणार्या एका ५५ वर्षे वयाच्या आरोपीस वनविभागाच्या कर्मचार्यांनी अटक केली असून न्यायालयाने त्या आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे. या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार जांभरुण नावजी परिसरात सकाळी ६ वाजताच्या सुमारास एका हराणाची शिकार करण्यात आल्याची घटना काही नागरिकांनी पहिल्यानंतर त्यांनी सदर घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचार्यांना दिली त्या माहितीवरुन वनपरिक्षेत्राधिकारी बी.के. चव्हाण यांच्या सह वनविभागाच्या कर्मचार्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून धांदलकर गौस पवार या ५५ वर्षे वयाच्या इसमास हरणाच्या मांसासह ताब्यात घेतले. हरिणाची शिकार करणार्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध वन्यजीवन संरक्षण कायदा १९७२ च्या कलम ९ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली त्यानंतर त्याला न्यायालयात न्यायाधिशांसमोर उभे केले असता न्यायाधिशांनी धांदलकर पवारला न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला त्यानुसार त्याची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या शिकारीच्या घटनेत अजूनकाही आरोपींचा सहभाग असण्याची शंका वनविभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.