‘त्या’ आरोपीच्या पोलीस कोठडीत १६ ऑक्टोबरपर्यंत वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:14 AM2017-10-12T01:14:25+5:302017-10-12T01:14:29+5:30
मानोरा: पोहरादेवी येथील विवाहित महिलेला नोकरीचे आमीष दाखवून यवतमाळ, पुणे येथे नेऊन सतत अत्याचार करणारा आरोपी रुपेश राजकुमार संत (रा.पंढरपूर) याच्याकडून अ पहरण प्रकरणात वापरलेले स्कॉर्पियो वाहन व १ लाख ३३ हजार रुपयांचे सोने मानोरा पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, ११ ऑक्टोबरला त्यास न्यायालयात हजर केले असता, अधिक चौकशीसाठी १६ ऑक्टोबरपर्यंत त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: पोहरादेवी येथील विवाहित महिलेला नोकरीचे आमीष दाखवून यवतमाळ, पुणे येथे नेऊन सतत अत्याचार करणारा आरोपी रुपेश राजकुमार संत (रा.पंढरपूर) याच्याकडून अ पहरण प्रकरणात वापरलेले स्कॉर्पियो वाहन व १ लाख ३३ हजार रुपयांचे सोने मानोरा पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, ११ ऑक्टोबरला त्यास न्यायालयात हजर केले असता, अधिक चौकशीसाठी १६ ऑक्टोबरपर्यंत त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, पोहरादेवी येथील महिलेशी फेसबुक, व्हॉटसअँपच्या माध्यमातून मैत्री करून तथा वारंवार संपर्क करून मैत्री वाढवली. तुला चांगल्या कंपनीत नोकरी लावून देतो, असे आमीष दाखवून आरोपी रुपेश संत याने सदर विवाहित महिलेस यवतमाळ, पुणे येथे नेऊन वारंवार तिच्यावर अत्याचार केले. छर्याच्या बंदुकीचा धाक दाखवून त्याने हा प्रकार केला. महिलेच्या अंगावरील सोने काढून ते विकले. दरम्यान, जवळचे पैसे संपताच महिलेच्या भावाला १ लाख रु पयांची मागणी आरोपीने केली होती. मागणीची पूर्तता न झाल्यास जिवे मारण्याची धमकीदेखील त्याने दिली, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोहरादेवी येथील विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने मानोरा पोलिसात दाखल केली होती. तक्रारीत घरातील सोन्याचे दागिनेही दिसत नसल्याचे नमूद केले होते. तक्रार प्राप्त होताच, पोलीस उपनिरीक्षक राहुल काटकाडे यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत सोलापूर येथून आरोपीस अटक केली व पीडित महिलेला अक्कलकोट येथून ताब्यात घेतले. फिर्यादी विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, आरोपीने यवतमाळ, पुणे येथे बंदुकीचा धाक दाखवून आपणावर सतत अत्याचार केले व अंगावरील सोने काढून विकले. याप्रकरणी न्यायालयाने आधी आरोपी संत यास ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. चौकशीदरम्यान आरोपीने अपहरण प्रकरणात वा परलेली स्कॉर्पियो गाडी, छर्याची बंदूक व दिग्रस (जि.यव तमाळ) येथील लक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडे चार सोन्याच्या बांगड्या (किंमत १,३३,६५0 रुपये) जप्त करण्यात आल्या. या बांगड्या मित्राच्या मदतीने आरोपीने विकल्या होत्या.
फेसबुक व व्हॉटसअँपच्या माध्यमातून महिलांना जाळ्यात ओढणार्या रुपेश संत याने याआधीही कित्येक महिलांना अशाचप्रकारे फसविल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक राहुल काटकाडे, मदन पुणेवर, सुनील गोतरकर करीत आहेत.