खासगी रुग्णालयांतील ११६ खाटा अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:23 AM2021-03-29T04:23:39+5:302021-03-29T04:23:39+5:30

वाशिम येथील डॉ. बिबेकर हॉस्पिटलमधील ४० खाटा (१५ ऑक्सिजन खाटा), वाशिम क्रिटीकल केअर हॉस्पिटलमधील १६ (२ व्हेंटिलेटर व १२ ...

Acquired 116 beds in private hospitals | खासगी रुग्णालयांतील ११६ खाटा अधिग्रहित

खासगी रुग्णालयांतील ११६ खाटा अधिग्रहित

Next

वाशिम येथील डॉ. बिबेकर हॉस्पिटलमधील ४० खाटा (१५ ऑक्सिजन खाटा), वाशिम क्रिटीकल केअर हॉस्पिटलमधील १६ (२ व्हेंटिलेटर व १२ ऑक्सिजन खाटा), डॉ. देवळे हॉस्पिटलमधील ४० (१ व्हेंटिलेटर व २१ ऑक्सिजन खाटा), लाईफ लाईन हॉस्पिटलमधील २० ( २ व्हेंटिलेटर व १० ऑक्सिजन खाटा) खाटा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आवश्यकतेप्रमाणे कोरोना बाधित रुग्ण पाठविण्याची व्यवस्था करू शकतील.

या रुग्णालयांना ‘आयसीएमआर’ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे तसेच महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे, उपचारासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी वर्ग २४ तास नियमित उपस्थित ठेवणे, रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती गोपनीय ठेवणे, तसेच रुग्णालयामध्ये पुरेशा प्रमाणात प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन), रुग्णवाहिका असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी रुग्णालयामध्ये विद्युत, पाणी व इतर आवश्यक सुविधा अखंडितपणे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तसेच रुग्णालयामध्ये एक नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. नोडल अधिकाऱ्यांची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात यावी. ज्या व्यक्ती निरीक्षणाखाली ठेवण्यात येतील त्या वैद्यकीय कक्षात यासंदर्भात काम करणारे हॉस्पिटलचे मनुष्यबळ व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशिवाय इतर कोणालाही प्रवेश राहणार नाही. तसेच याठिकाणी आलेल्या व गेलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या आवश्यक नोंदणी ठेवणे बंधनकारक राहील. शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींचे रुग्णालयांनी तंतोतंत पालन करावे. उल्लंघन झाल्यास सदरची परवानगी रद्द करून कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच सदर हॉस्पिटलचे क्षेत्र हे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Acquired 116 beds in private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.