शाळा समिती व्यवस्थापन समितीला ग्रहण
By admin | Published: September 18, 2014 01:18 AM2014-09-18T01:18:51+5:302014-09-18T01:18:51+5:30
मंगरूळपीर तालुक्यातील वास्तव, शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीत राजकारणाचा शिरकाव.
मंगरुळपीर: तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीत राजकारणाचा शिरकाव मोठय़ा प्रमाणात होत असल्याने शाळा व्यवस्थापन समित्यांनाच ग्रहण लागल्याचा प्रकार तालूक्यात दिसुन येत आहे.
शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ अंर्तगत १४ वर्षा पर्यंत बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. त्याच बरोबर बालकांच्या हितास्तव कायदय़ार्तंगत अनेक कलमाव्दारे विविध बाबींचा अंतर्भाव करण्यात आला.त्यातीलच शाळा व्यवस्थापन समिती दोन वर्षाकरिता स्थापन करण्याचे नमुद करण्यात आले. या अगोदर शाळा समित्या अस्तित्वात होत्या. विद्यमान सरपंच पदसिध्द अध्यक्ष असायचे. परंतु सरपंच पद हे राजकारणातुन आलेले असल्यामुळे श२ाळेत राजकारणाचा शिरकाव व्हायचा. तसेच सरपंचाचे पाल्य शाळेत असेलच असे नाही.त्यामुळे शाळेविषयी आस्थेचा प्रश्न्न निर्माण व्हायचा त्याच अनुसंगाने अधिनियमातील तरतुदी नुसार प्रत्येक वर्गाच्या पालकांना शाळा व्यवस्थापन समितीत प्रतिनिधीत्व मिळावे व त्यांचेमधुनच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडला जावा हे अभिप्रेत आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येक गावातील प्रतिष्ठीत समाजातील मुले अभावानेच शिक्षण घेत आहेत.त्यांची संख्या अत्यल्प आहे.परंतु अध्यक्ष पद आपल्यालाच मिळावे या हेतुने गावात गटातटाचे राजकारण करून शाळा व्यवस्थापन समिती स्थापनेला निवडणुकीचे स्वरूप देवुन शाळेत गटातटाचे राजकारण करित असल्याचे चित्र आहे.