१४ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:30 AM2021-06-02T04:30:30+5:302021-06-02T04:30:30+5:30

वाशिम : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनचालकांना मास्क लावणे बंधनकारक केले असतानाही सोमवारी वाशिम-पुसद मार्गावर चालक विनामास्क आढळून आले. ...

Action on 14 vehicles | १४ वाहनांवर कारवाई

१४ वाहनांवर कारवाई

Next

वाशिम : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनचालकांना मास्क लावणे बंधनकारक केले असतानाही सोमवारी वाशिम-पुसद मार्गावर चालक विनामास्क आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

.....................

तिबलसीट वाहतुकीकडे दुर्लक्ष

किन्हीराजा : मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून किन्हीराजाची ओळख आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील बाजारपेठ लवकरच बंद होत आहे; मात्र वाहने सुरूच असून दुचाकी वाहनांवर तिबलसीट वाहतुकीचा प्रकारही घडत असल्याचे दिसून येत आहे.

..........................

उंबर्डा येथे घरोघरी आरोग्य तपासणी

उंबर्डा बाजार: कारंजा तालुक्यात घरोघरी जावून कोरोना चाचणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात कोराेना बाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळत असल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

......................

संपर्कातील व्यक्तींच्या माहितीसाठी आवाहन

धनज बु. : धनज बु. परिसरात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नियंत्रणासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तातडीने कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करून स्वत:च बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Web Title: Action on 14 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.