५८ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:50+5:302021-07-07T04:50:50+5:30

0000 करडा परिसरात वीजपुरवठा खंडित वाशिम : रिसोड तालुक्यातील करडा परिसरातील काही गावांत वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे ...

Action on 58 vehicles | ५८ वाहनांवर कारवाई

५८ वाहनांवर कारवाई

Next

0000

करडा परिसरात वीजपुरवठा खंडित

वाशिम : रिसोड तालुक्यातील करडा परिसरातील काही गावांत वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

00000000000000000

०००

कवठा येथे आरोग्य तपासणी

वाशिम : रिसोड तालुक्यातील कवठा येथील एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने, आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

००

देयके अदा करण्याचे आवाहन

वाशिम : जिल्ह्यातील ५६ हजारांवर ग्राहकांकडे ४९ कोटींपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत सापडले आहे. ही बाब लक्षात घेता ग्राहकांनी देयके अदा करावीत, असे आवाहन महावितरणने केले.

००

अतिक्रमणाचे सर्वेक्षण केव्हा होणार?

वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. कोरोनाकाळात सर्वेक्षण रखडले होते. आता कोरोनाचा आलेख खाली आल्याने सर्वेक्षण करण्याची मागणी समोर आली आहे.

००००००

संरक्षक समित्यांनी सतर्क राहावे !

वाशिम : बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील ७०० गावांमध्ये बाल संरक्षक समिती स्थापन केली. गावात किंवा परिसरात कुठेही बालविवाह होत असल्यास तो रोखण्यासाठी समितीमधील सदस्यांनी नियमित सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने सोमवारी केले.

Web Title: Action on 58 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.