विनामास्क फिरणाऱ्या १०१२३ जणांवर कारवाई; ४०.६८ लाखांची दंड वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:12 PM2020-09-20T13:12:58+5:302020-09-20T13:13:07+5:30
मोहिमेत १० हजार १२३ जणांवर कारवाई करून ४० लाख ६८ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी प्रशासनाने काही क ठोर उपाय योजना करताना तोंडाला मास्क वा रुमाल न बांधणाºयांकडून दंड वसूल करण्याची मोहिम पोलिसांमार्फत राबविली. त्यात जिल्हाभरात पोलिसांनी सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत राबविलेल्या मोहिमेत १० हजार १२३ जणांवर कारवाई करून ४० लाख ६८ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल केला. एवढी मोठी कारवाईसुद्धा जनतेच्या डोळ्यावरची धुंदी उतरविण्यास असमर्थ ठरली असून, कोरोना संसर्ग नियंत्रणात येण्याऐवजी वाढतच आहे.
वाशिम जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत केवळ ५९४ लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यापैकी ३८६ लोकांनी कोरोनावर मात केली, तर१६ लोकांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रीत करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी तोंडावर मास्क वा रूमाल न बांधता फिरणाºया नागरिकांकडून २०० रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्याची कठोर अमलबजावणी पोलिसांनी केली आणि ३३१० लोकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ६ लाख ६२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. एवढ्या कारवाईनंतरही लोकांनी २०० रुपयांसह स्वत:च्या जिवाची काळजी घेत मास्क वा रूमाल बांधण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि जिल्हाधिकाºयांनी अगदी अनलॉकच्या काळातही तोंडाला मास्क न लावणाºयांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनीही पूवीर्पेक्षा अधिक कठोर भूमिका घेत ६ हजार ८१३ लोकांकडून ३४ लाख ६ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. अर्थात पोलिसांनी मास्क न लावणाºयांवर जिल्हाभरात दोन्ही मिळून १० हजार १२३ कारवाया करीत ४० लाख ६८ हजार ५०० रुपये दंडापोटी वसूल केले. एवढ्या गंभीर कारवाईनंतरही जिल्ह्यातील जनता अद्यापही कोरोना संसगार्बाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच जिल्ह्यात १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण ३ हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ५७ लोकांचा मृत्यू झाला, तर २१२८ बरे होऊन घरी परतले.
कारवाई केवळ रस्ते व चौकात
कोरोना संसगार्पासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने गंभीर पावले उचलली आणि कठोर कारवायासुद्धा केल्या; परंतु त्या कारवाया कोरोना रोखण्यात असमर्थच ठरल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाºयांवर केवळ सार्वजनिक ठिकाणी त्यातही शहरातील मुख्य चौकांतच कारवाईचे सत्र राबविले जाते. प्रत्यक्षात शहराच्या आतील भागांत त्यापेक्षाही अधिक प्रमाणात होणारे नियमांचे उल्लंघन मात्र दुर्लक्षीतच राहते. अर्थात कारवाई होते चौकांत आणि कोरोना फिरतो गावांत, अशीच स्थिती आहे.