¸मास्क नसलेल्या २१ दुचाकीस्वारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:19 AM2021-02-21T05:19:20+5:302021-02-21T05:19:20+5:30

.अवकाळी पावसामुळे गावांत घाणीचे साम्राज्य उंबर्डा बाजार ( वार्ताहर ) अवकाळी पाऊस तथा गावातील नाल्याची गेल्या अनेक महीन्यापासुन साफसफाई ...

Action against 21 two-wheelers without masks | ¸मास्क नसलेल्या २१ दुचाकीस्वारांवर कारवाई

¸मास्क नसलेल्या २१ दुचाकीस्वारांवर कारवाई

Next

.अवकाळी पावसामुळे गावांत घाणीचे साम्राज्य

उंबर्डा बाजार ( वार्ताहर ) अवकाळी पाऊस तथा गावातील नाल्याची गेल्या अनेक महीन्यापासुन साफसफाई झाली नसल्याने नालीमधील सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे गावात साथरोगाची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. .

अवकाळी पावसाने वीजपुरवठा खंडित

उंबर्डा बाजार : वादळीवाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे उंबर्डा बाजारसह परिसरातील वीज पुरवठा १८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास खंडित झाला होता.

मात्र उंबर्डा बाजार महावितरण कंपनी कार्यालयाचे अभियंता सूर्यवंशी पाच तास अथक परिश्रम घेवुन खंडीत विजपुरवठा सुरळीत केला .

------------------

उसतोड कामगारांच्या राहुट्या उडाल्या

उंबर्डा बाजार: पिलखेडा पिंप्री ( वरघट ) परिसरात उसतोडणीसाठी आलेल्या कामगारांनी पिलखेडा फाट्या समोरील शेतात निवाऱ्यासाठी उभारलेल्या तात्पुरत्या राहुट्या १८ फेब्रुवारी रोजी वादळीवाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे उडून गेल्या. त्यामुळे उसतोड कामगाराना प्रवाशी निवाऱ्याचा आधार घ्यावा लागला

----------------

पीक नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षा

उंबर्डा बाजार: गत वर्षी फेब्रुवारी महिन्यात गारपीटीने उंबर्डा बाजारसह परिसरातील गहू, हरबऱ्यासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेला घटनेला एक वर्ष उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही.

Web Title: Action against 21 two-wheelers without masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.