मास्कप्रकरणी ३० चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:41 AM2021-04-16T04:41:59+5:302021-04-16T04:41:59+5:30
००० दुष्काळी सवलतींचा लाभ देण्याची मागणी ! वाशिम : जिल्ह्यातील गावांची खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी सरासरी ४५ पैसे आल्याने ...
०००
दुष्काळी सवलतींचा लाभ देण्याची मागणी !
वाशिम : जिल्ह्यातील गावांची खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी सरासरी ४५ पैसे आल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे केली.
०००००
कारंजात गुटखाविक्री खुलेआम सुरूच
वाशिम : कारंजा शहरात गुटखा विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाईच्या घटना घडत असतानासुद्धा कारंजात खुलेआम गुटखाविक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
०००००
नियंत्रण कार्यालयाचा अभाव; कर्मचारी त्रस्त
वाशिम : राज्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रण कार्यालय नसल्याने कर्मचाऱ्यांना आपल्या कामासाठी अकोला येथे जावे लागते. यामुळे पैसा व वेळ खर्च होत आहे. संबंधितांनी लक्ष देऊन वाशिम येथे विभागीय कार्यालय स्थापन करण्याची मागणी कर्मचाऱ्यांतून केली जात आहे.
००
कवठळ येथ चार कोरोना पॉझिटिव्ह
वाशिम : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथे १५ एप्रिल रोजी प्राप्त अहवालानुसार, चारजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरोग्य विभागाची चमू गावात दाखल झाली असून, तपासणी सुरू केली.
००
उपबाजारांची अवस्था वाईट
वाशिम : जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत येणाऱ्या पाच उपबाजारांपैकी तीन उपबाजारांची अवस्था वाईट आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने शेतमाल विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
००
बालविवाहांवर प्रशासनाची नजर
वाशिम : जिल्ह्यात होणाऱ्या बालविवाहांवर प्रशासनाची करडी नजर आहे. त्यानुषंगाने आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी गुरुवारी दिली.
००
ज्येष्ठांनी तातडीने चाचणी करावी !
वाशिम : ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्गाची लागण लवकर होते. त्यामुळे लक्षणे असल्यास त्यांनी तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन वाशिम तालुका आरोेग्य अधिकारी डॉ. डावरे यांनी केले आहे.
००
आययूडीपीमधील नाल्यांची सफाई करा
वाशिम : शहरातील जुनी आययूडीपी कॉलनी परिसरात घाण पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची दैनंदिन सफाई होत नसल्याने त्यातून दुर्गंधी पसरत आहे. याकडे नगर परिषदेने लक्ष पुरवून नाल्यांची सफाई करण्याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी तेजराव वानखडे यांनी न. प.कडे केली.
००
स्वतंत्र कार्यालय नसल्याने गैरसोय
वाशिम : कृषी विभागातील महत्त्वाचे पद असलेल्या तालुका अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यालय नाही. जिल्ह्यातील बहुतांश तालुका कृषी अधिकारी कार्यालयांचा कारभार हा भाड्याच्या इमारतीत सुरू असून, आवश्यक सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.