मास्क न वापरल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:31 AM2021-02-19T04:31:16+5:302021-02-19T04:31:16+5:30
जिल्हाधिकारी श्णमुगराजन यांनी दिलेल्या आदेशानुसार काेराेना नियमांचे सर्वांनी पालन करावे, पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी फिरू नये यासह काेराेना नियम १७ ...
जिल्हाधिकारी श्णमुगराजन यांनी दिलेल्या आदेशानुसार काेराेना नियमांचे सर्वांनी पालन करावे, पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी फिरू नये यासह काेराेना नियम १७ फेब्रुवारी राेजी जारी करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात सर्वत्र काेराेना नियमांचे पालन कर्तव्य पार पाडले जात आहे. पाेलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र काैतुक केले जात आहे.
जिल्हाधिकारी श्णमुगराजन यांनी दिलेल्या आदेशानुसार, काेराेना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची माेहीम हाती घेण्यात आली आहे. मास्क वापरणे बंधनकारक केले असून, जाे मास्कचा वापर करणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याने मंगरुळपीर शहरामध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे. १६ व १७ फेब्रुवारी राेजी एकूण ५३ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये १७ फेब्रुवारी राेजी खुद्द नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर मास्क न वापरल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी रोजी पालिका मुख्याधिकारी यांनी मास्क न वापरल्याप्रकरणी पोलिसांनी दंड केला असून, गर्दी टाळून नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदरची दोन दिवसांची कारवाई पोलीस कर्मचारी वसंता जाधव, अमोल वारकड, नारायण शिंदे, गजानन मुखाडे यांनी केली आहे.
...............
नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्यांकडूनच नियमांचे उल्लंघन
जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेली काेराेनाबाधितांची संख्या पाहता जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीसह मास्क वापरणे बंधनकारक असल्याच्या सूचना जारी केल्या आहेत. याचे पालन नगरपालिका क्षेत्रामध्ये नगरपालिकेतर्फे करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. असे असताना खुद्द नगर परिषदेचे मुख्याधिकारीच मास्क वापरत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, नियमांचे पालन करण्यासाठी पुढाकार घेणारेच उल्लंघन करीत असल्याची चर्चा मंगरुळपीर शहरात दिसून येत आहे.