सावरगाव फॉरेस्ट शाळेवरील मुख्याध्यापकांविरूद्ध तीन दिवस विनावेतनची कारवाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:46 PM2018-08-28T17:46:52+5:302018-08-28T17:47:09+5:30
तळप बु. (वाशिम) : आकस्मिक भेटीत गैरहजर आढळणाºया सावरगाव (फॉरेस्ट) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांविरूद्ध तीन दिवस ‘विनावेतन’ अशी कारवाई मानोरा गटविकास अधिकाºयांनी २४ आॅगस्ट रोजी केली
- संतोष इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
तळप बु. (वाशिम) : आकस्मिक भेटीत गैरहजर आढळणाºया सावरगाव (फॉरेस्ट) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांविरूद्ध तीन दिवस ‘विनावेतन’ अशी कारवाई मानोरा गटविकास अधिकाºयांनी २४ आॅगस्ट रोजी केली. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
सावरगाव फॉरेस्ट येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक भागवत कोरे हे १८ जुलै रोजी मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरज गोहाड यांच्या शाळा भेटीदरम्यान शाळेवर गैरहजर आढळुन आले होते. १६ जुलै रोजी मस्टरवर स्वाक्षरी नव्हती तसेच १७ व १८ जुलै रोजी ते गैरहजर होते. त्यांचा रजेचा अर्ज होता; परंतु त्यावर तारखेचा व अध्यक्षाची स्वाक्षरी नव्हती. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत दैनंदनि नोंदी ९ जुलैपासुन घेतल्या नव्हत्या तसेच रजिस्टर उपलब्ध नव्हते. याशिवाय विद्यार्थ्यांची गुणवत्ता साधारण आढळली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने २४ जुलैच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. गैरहजर प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर यासंदर्भात सविस्तर चौकशी करण्यात आली. शेवटी गटशिक्षणाधिकाºयांच्या अहवालावरून गटविकास अधिकारी सुरज गोहाड यांनी २४ आॅगस्ट २०१८ च्या आदेशान्वये मुख्याध्यापक कोरे यांच्यावर शिस्तभंग तसेच तीन दिवस विनावेतन अशी कारवाई केली.